आज शहरात दुसऱ्या डोससाठी लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:17 AM2021-06-03T04:17:18+5:302021-06-03T04:17:18+5:30
कोल्हापूर : शहरामध्ये बुधवारी तीन प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र व सीपीआर हॉस्पिटलमध्ये मिळूण एकूण ३१६ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. ...
कोल्हापूर : शहरामध्ये बुधवारी तीन प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र व सीपीआर हॉस्पिटलमध्ये मिळूण एकूण ३१६ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र फिरंगाई येथे १००, राजारामपुरी येथे २०, पंचगंगा येथे ३८ व सीपीआर हॉस्पिटल येथे १५८ इतक्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शहरात आतापर्यंत एक लाख १६ हजार ५०९ नागरिकांना पहिल्या डोसचे तर, ४१ हजार ००५ नागरिकांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.
कोविशिल्डचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांनी दुसऱ्या डोस घेण्यासाठी गुरुवारी महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे. तसेच कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांनी दुसऱ्या डोसकरिता नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र पंचगंगा येथे लसीकरण करण्यात येणार आहे.