लसीकरण लोकचळवळ झाली पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:24 AM2021-03-19T04:24:21+5:302021-03-19T04:24:21+5:30

महागाव : कोरोनाची दुसरी लाट समोर आहे. पुन्हा नव्याने लढण्यासाठी आपण सज्ज झाले पाहिजे. गावाचे आरोग्य जपण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींनी ...

Vaccination should be a popular movement | लसीकरण लोकचळवळ झाली पाहिजे

लसीकरण लोकचळवळ झाली पाहिजे

Next

महागाव : कोरोनाची दुसरी लाट समोर आहे. पुन्हा नव्याने लढण्यासाठी आपण सज्ज झाले पाहिजे. गावाचे आरोग्य जपण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे. जनसेवेची ही संधी समजून काम केले पाहिजे. शासकीय यंत्रणेचे सहकार्य आहेच. लसीकरण ही लोकचळवळ झाली पाहिजे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.

महागाव (ता. गडहिंग्लज) येथे नूल प्राथमिक आरोग्य केंद्रातील संलग्न गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य व शिक्षकांच्या कोरोना लसीकरण आढावा बैठकीत ते बोलत होते.

चव्हाण म्हणाले, तरुणांनी श्रावणबाळाच्या भूमिकेतून वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण बुथवर आणण्याचे प्रयत्न केले पाहिजे. यासाठी एक निकोप स्पर्धा तयार झाली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

गटविकास अधिकारी शरद मगर यांनी आपल्या मनोगतातून गडहिंग्लज तालुका लसीकरणात आघाडीवर राहील, अशी ग्वाही दिली.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या लसीकरणाची पाहणी करून चव्हाण यांनी संबंधितांना सूचना दिल्या.

बैठकीस तहसीलदार दिनेश पारगे, सभापती रूपाली कांबळे, उपसभापती इराप्पा हसुरी, जि. प. सदस्या राणी खमलेट्टी, पं. स. सदस्य विजयराव पाटील, श्रीया कोणकेरी, बनश्री चौगुले, इंदू नाईक, सरपंच ज्योत्स्ना पताडे, उपसरपंच निवृत्ती मांडेकर, ग्रामविकास अधिकारी शशिकांत कुंभार, वैद्यकीय अधिकारी सुप्रिया खन्ना आदी उपस्थित होते.

--------------------------

फोटो ओळी :

महागाव (ता. गडहिंग्लज) येथील कार्यक्रमात संजयसिंह चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, सरपंच ज्योत्स्ना पताडे, सभापती रूपाली कांबळे, उपसभापती इराप्पा हसुरी उपस्थित होते.

क्रमांक : १८०३२०२१-गड-०८

Web Title: Vaccination should be a popular movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.