लसीकरणाला लोकचळवळीचे स्वरूप मिळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:25 AM2021-04-08T04:25:40+5:302021-04-08T04:25:40+5:30
कोपार्डे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, यासाठी लसीकरणाला लोकचळवळीचे स्वरूप द्यावे, असे आवाहन सरपंच ...
कोपार्डे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, यासाठी लसीकरणाला लोकचळवळीचे स्वरूप द्यावे, असे आवाहन सरपंच शारदा पाटील यांनी केले.
कोपार्डे आरोग्य उपकेंद्रात लसीकरणाचा प्रारंभ सरपंच शारदा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पंचायत समिती उपसभापती अविनाश पाटील, जि. प. सदस्य रसिका पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अविनाश पाटील म्हणाले, आरोग्य विभागाने कोरोना लसीकरणाला गती देण्यासाठी करवीर तालुक्यात लसीची उपलब्धता करून दिली आहे. यावेळी उपसरपंच सरदार जामदार, पोलीसपाटील जालिंदर जामदार, नामदेव पाटील, व्ही. जी. पाटील, अमर पाटील, रूपाली पारकर, भूषण पाटील, केशव पाटील, ग्रामविकास अधिकारी महेश पाटील उपस्थित होते.
फोटो
: ०७ कोपार्डे लसीकरण
कोपार्डे (ता. करवीर) येथे आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपसभापती अविनाश पाटील, जि. प. सदस्य रसिका पाटील, उपसरपंच सरदार जामदार उपस्थित होते.