महापालिकेतर्फे दोन हजार नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:27 AM2021-08-28T04:27:24+5:302021-08-28T04:27:24+5:30
कोल्हापूर : महापालिकेच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांतून शुक्रवारी कोविशिल्डचे १९९४ नागरिकांचे लसीकरण झाले. त्यामध्ये ३५ हेल्थ केअर वर्कर ...
कोल्हापूर : महापालिकेच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांतून शुक्रवारी कोविशिल्डचे १९९४ नागरिकांचे लसीकरण झाले. त्यामध्ये ३५ हेल्थ केअर वर्कर व फ्रंटलाईन वर्कर, १८ ते ४५ वर्षांपर्यंत ६०८ नागरिक, ४५ ते ६० वर्षांपर्यंत ९३४ नागरिकांचे व ६० वर्षांवरील ४१७ नागरिकांचा समावेश आहे.
आज, शनिवारी,१८ ते ४५ वर्षे वयोगटांतील नागरिकांना कोविशिल्डचा पहिला डोस देण्यात येणार आहे. यामध्ये ज्या लाभार्थ्यांनी पहिल्या डोसच्या लसीकरणासाठी कोविन पोर्टलवर ऑनलाईन रजिस्टेशन केले आहे. अशांनीच फक्त महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांकडे लसीकरण करण्यासाठी यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले, फिरंगाई, राजारामपुरी, पंचगंगा, कसबा बावडा, महाडिक माळ, आयसोलेशन, फुलेवाडी, सदर बाजार, सिद्धार्थनगर, मोरे-माने नगर, भगवान महावीर दवाखाना व कदमवाडी या केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे.