हातकणंगले उपकेंद्रात लसीसाठी वशिलेबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:25 AM2021-05-11T04:25:59+5:302021-05-11T04:25:59+5:30
हातकणंगले येथील पाच तिकटी परिसरातील आरोग्य उपकेंद्रात ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी दुसऱ्या डोसचे लसीकरण सुरू आहे. त्यासाठी नागरिक गर्दी करत ...
हातकणंगले येथील पाच तिकटी परिसरातील आरोग्य उपकेंद्रात ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी दुसऱ्या डोसचे लसीकरण सुरू आहे. त्यासाठी नागरिक गर्दी करत असून अगदी पहाटेपासूनच या केंद्रावर रांगा लागलेल्या असतात. या ठिकाणी कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. चिंचवाडे यांच्यासह आरोग्य सेवक, परिचारिका, अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत.
सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे लसीकरणासाठी रांगा लागलेल्या असतानाच काही बँक कर्मचारी तेथे आले. त्यांनी डॉ. चिंचवाडे यांच्याशी बोलणे केल्यानंतर चिंचवाडे त्यांना आरोग्य केंद्राच्या मागील खोलीत घेऊन गेले व परस्परच त्यांचे लसीकरण करण्याची प्रक्रिया सुरू केली. हा प्रकार समजताच उपस्थित नागरिकांसह नगराध्यक्ष अरुण जानवेकर व इतर लोकप्रतिनिधी यांनी त्यांना धारेवर धरले. त्यानंतर हा प्रकार थांबला.
कोट..
डॉ. कुनाल चिंचवाडे यांना ताकीद दिली जाईल. ज्येष्ठ नागरिक आणि दुसरा डोस असलेल्या नागरिकांना प्राधान्य आहे. यापुढे असे प्रकार घडणार नाहीत याची खबरदारी घेऊ.
- डॉ. सुहास कोरे,
तालुका आरोग्य अधिकारी