शिरोळ तालुक्यात लस उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:23 AM2021-04-11T04:23:59+5:302021-04-11T04:23:59+5:30

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यासाठी शनिवारी साडेसाठ हजार कोविड लसी उपलब्ध झाल्या. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने दहा केंद्रांवर लसीकरण ...

Vaccine available in Shirol taluka | शिरोळ तालुक्यात लस उपलब्ध

शिरोळ तालुक्यात लस उपलब्ध

Next

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यासाठी शनिवारी साडेसाठ हजार कोविड लसी उपलब्ध झाल्या. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने दहा केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात आले. आज(रविवार)पासून सर्वच केंद्रांवर लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे.

शासनाकडून लसीचा पुरवठा झाला नसल्याने जवळपास तालुक्यात २५ ठिकाणी सुरू असलेल्या केंद्रांमध्ये आरोग्य विभागाने गुरुवारी लसीकरण

थांबविले होते.

लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरणात पूर्णपणे खंड पडला होता. तालुक्यासाठी २३ हजार लस डोस मागविण्यात आले होते. मात्र, साडेतीन हजारच डोस उपलब्ध झाले होते. तालुक्यातील सर्वच केंद्रांवरील लस डोस संपल्यामुळे आरोग्य विभागाने लसीकरण थांबविले होते. दरम्यान, शनिवारी तालुक्यासाठी साडेआठ हजार लस डोस उपलब्ध झाले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद दातार यांनी दिली.

Web Title: Vaccine available in Shirol taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.