कोरोचीत लस संपल्याचा फलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:27 AM2021-04-09T04:27:00+5:302021-04-09T04:27:00+5:30
इचलकरंजी : कोरोची (ता.हातकणंगले) येथे ४५ वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. लसीकरणास प्रारंभ होऊन २० दिवसांचा कालावधी झाला ...
इचलकरंजी : कोरोची (ता.हातकणंगले) येथे ४५ वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. लसीकरणास प्रारंभ होऊन २० दिवसांचा कालावधी झाला आहे. परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रात लस नसल्याचे फलक लावण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थ परतत असून, लस कधी मिळणार, अशी विचारणा होत आहे. कोरोचीत १७ मार्चला मराठी शाळेमध्ये कोविड १९ लसीकरणास प्रारंभ झाला. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत लसीकरण केले जात असून, रविवारी बंद ठेवण्यात आले. गावातील वयोवृद्धांची संख्या नऊ हजार असून, २०० ते २५० लसीकरणाचे लक्ष्य शासनाने ग्रामपंचायतीस दिले आहे. त्यानुसार २०० ते २२५ लसीकरण होत असून, आतापर्यंत १६०० चा आकडा पार गेला आहे. गावामध्ये शासनाचे निर्बंध पाळून कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यास ग्रामपंचायतीला यश आले आहे. सध्या लसीची कमतरता असल्याचे तीन-चार दिवसांपूर्वी शासनाला कळविले आहे.
फोटो ओळी
०८०४२०२१-आयसीएच-०८
कोरोची (ता.हातकणंगले) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लस संपल्याचा फलक लावला आहे.