माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:18 AM2021-06-29T04:18:06+5:302021-06-29T04:18:06+5:30
सोमवारी (२८) तालुक्यासाठी २३० कोविशिल्ड डोस जिल्हा आरोग्य विभागाकडून पाठविण्यात आले होते. त्यापैकी माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी १००, कोवाडला ...
सोमवारी (२८) तालुक्यासाठी २३० कोविशिल्ड डोस जिल्हा आरोग्य विभागाकडून पाठविण्यात आले होते. त्यापैकी माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी १००, कोवाडला १०० व चंदगडसाठी ३० डोस असे नियोजन केले होते. माणगाव केंद्रात डोस आल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी दुसरा डोस मिळविण्यासाठी सकाळपासूनच केंद्रात मोठी गर्दी केली होती.
पुरवठा केलेल्या डोसपैकी ८० डोस तांबूळवाडी-डुक्करवाडी उपकेंद्रात देण्यात आले. त्यामुळे २० डोस शिल्लक राहिल्याने १० पुरुष व १० महिलांची नोंद करून ती देण्यात आली.
डोसचा पुरवठा अनियमित असल्याने लोकांना नेहमीच रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. सोमवारी पुन्हा हा प्रकार झाल्याने नागरिकांनी आरोग्य अधिकारी डॉ. अरविंद पठाणे यांना जाब विचारला.
या वेळी डॉ. पठाणे म्हणाले, आमच्याकडे जिल्हा आरोग्य विभागाकडूनच डोसचा पुरवठा कमी येतो. त्यामुळे वाढीव डोस पुरवठ्याची मागणी केली आहे.
चौकट :
६३ जणांची अॅन्टिजन तपासणी
माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पाटणे फाटा येथे दुकानदारांची कोरोना चाचणी घेण्यात आली. ६३ जणांची अॅन्टिजन तर, २२ जणांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली. त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले.
सोमवारी दिवसभर पूर्ण तालुक्यासाठी केवळ २३० डोस डोस पुरविण्यात आले होते. त्यातील १०० डोस कोवाड तर १०० डोस माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात आले आणि उरलेले ३० डोस चंदगड केंद्रात लोकांना देण्यात आले. इतर तालुक्याच्या मानाने चंदगडला डोस पुरवठा कमी होत असल्याने त्याचे नियोजन करताना आमची नेहमीच दमछाक होत असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत यांनी सांगितले. कोवाड व चंदगड केंद्रांतर्गत १३० जणांना लस देण्यात आली
फोटो ओळी : माणगाव (ता. चंदगड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डोस घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
क्रमांक : २८०६२०२१-गड-०४