व्हॅक्सिन स्टोअरेज सिस्टीम संकल्पना आंतरराष्ट्रीय पातळीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:17 AM2021-07-09T04:17:05+5:302021-07-09T04:17:05+5:30
यड्राव : येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील विद्यार्थ्यांच्या प्रकल्प संकल्पनेची आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. या ...
यड्राव : येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील विद्यार्थ्यांच्या प्रकल्प संकल्पनेची आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. या प्रकल्पास पुढील संशोधनासाठी इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अॅन्ड इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर्सकडून निधी प्राप्त झाला आहे. आयईईई रिजन १० एसएसी यांच्याकडून आयोजित केलेल्या स्पेशल कॉल फॉर कोविड-१९ रिलेटेड प्रोजेक्ट या स्पर्धेमध्ये अनेक देशांमधून विद्यार्थी सहभागी झाले होते. निवड झालेल्या या संकल्पनेमध्ये आय. आय. टी., एन. आय. टी. इन्स्टिट्यूटसोबत देश व परदेशांतील महाविद्यालयांचा समावेश आहे.
शरद इन्स्टिट्यूट ही महाराष्ट्र राज्यातील एकमेव स्वायत्त संस्था आहे. बॉम्बे विभागांतर्गत शरदच्या 'डिझाईन अॅन्ड डेव्हलपमेंट ऑफ आयओटी बेस्ड व्हॅक्सिंग स्टोअरेज सिस्टीम’ या प्रकल्प संकल्पनेची निवड झाली आहे. या सिस्टीममध्ये थर्मल एनर्जी स्टोअरेजचा वापर करून इनऑरगॅनिक आणि युटेक्टिक हे फेजचेंज मटेरिअल वापरण्यात येणार आहे. ज्यामुळे वीज नसतानाही पुढील सहा ते आठ तासांपर्यंत तापमान नियंत्रणात ठेवता येईल. ग्रामीण भागातील होणारे भारनियमन पर्यायाने लसींचे होणारे नुकसान या समस्येवर हे यंत्र अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
शरद इन्स्टिट्यूटमधील रोहित दायमा, रिया पाटील, संकेत बापट, अभिषेक भगाटे, श्रीनाथ भोई, नलिनी माने, श्रद्धा महाडिक या विद्यार्थ्यांनी ही संकल्पना मांडली आहे. त्यांना पुढील संशोधनासाठी चारशे यू.एस.डी. इतका निधी प्राप्त झाला आहे.
प्रा. अवेसअहमद हुसेनी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प होत आहे. आयईईई स्टुडंट ब्रँचचे सल्लागार प्रा. मोहसिन मुल्ला यांच्यासह प्राचार्य डॉ. एस. ए. खोत, विभागप्रमुख डॉ. पी. एम. भागवत यांचे सहकार्य मिळाले. संस्थेचे अध्यक्ष राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांचे अभिनंदन केले.