वडणगे जिल्हा परिषद मतदार संघात पुन्हा शिवसेनेचेच वर्चस्व सिद्ध
By Admin | Published: February 23, 2017 07:36 PM2017-02-23T19:36:47+5:302017-02-23T19:36:47+5:30
अत्यंत चुरशीने हायटेक प्रचार यंत्रणा राबवत निवडणूक झाली. नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावत मतदार संघ पिंजून काढला होता.
वडणगे : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या वडणगे जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेनेच जिल्हा परिषदेसह दोन्ही पंचायत समितीच्या जागा जिंकून या मतदार संघावर आपले वर्चस्व दाखवून दिले. या विजयाने शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. सरासरी ८० टक्के मतदान या मतदार संघात झालेले होते. कॉँग्रेस, शिवसेना, भाजप व अपक्ष अशा बहुरंगी लढती या मतदार संघात झाल्या. अत्यंत चुरशीने हायटेक प्रचार यंत्रणा राबवत निवडणूक झाली. नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावत मतदार संघ पिंजून काढला होता. वडणगे जि.प. मतदार संघात २६८१३ तर वडणगे तर पं.स. १२५८८ व खुपीरे पं.स. १४२२५ मतदान झाले होते. दरम्यान, जिल्हा परिषद मतदार संघातून शिवसेनेच्या कोमल सरदार मिसाळ-१२०३४, शिवसेनेचे वडणगे पं.स. चे इंद्रजित वसंतराव पाटील ५६५३ व खुपीरे पं.स.च्या यशोदा संजय पाटील या ५०५० मते घेऊन विजयी झाल्या. याठिकाणी कॉँग्रेसचे उल्का संजय बुचडे, रवींद्र बळिराम पाटील, आशा प्रवीण पाटील यांना तर भाजपचे भारती विठ्ठल नांगरे, संभाजी गणपत पाटील, अनिता गिरी तसेच अपक्ष शैला माने, अस्मिता नांगरे, जयवंत कुंभार, सचिन पाटील, कोमल आंग्रे यांचा पराभव झाला.