आयशर टेम्पोच्या धडकेत वहिफणी व्यावसायिक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:30 AM2021-07-07T04:30:51+5:302021-07-07T04:30:51+5:30

इचलकरंजी : येथील डेक्कन मिल चौकात आयशर टेम्पोखाली सापडून मोपेडस्वार तरुण ठार झाला. नवनाथ राजाराम पोवार (वय ३३, रा. ...

Vaifani professional killed in Eicher tempo collision | आयशर टेम्पोच्या धडकेत वहिफणी व्यावसायिक ठार

आयशर टेम्पोच्या धडकेत वहिफणी व्यावसायिक ठार

Next

इचलकरंजी : येथील डेक्कन मिल चौकात आयशर टेम्पोखाली सापडून मोपेडस्वार तरुण ठार झाला. नवनाथ राजाराम पोवार (वय ३३, रा. जवाहरनगर) असे त्याचे नाव आहे. तो वहिफणीचा व्यवसाय करीत होता. या अपघातात त्याचा मित्र गणेश रवींद्र परीट (२३, रा. इरगोंडा पाटीलनगर) हा जखमी झाला आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. हा अपघात मंगळवारी दुपारी बारा वाजता घडला.

घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, नवनाथ हा मंगळवारी दुपारी नवनाथ व त्याचा मित्र गणेश हे दोघे मोपेड (एमएच ०९ ईडी ९१२७) वरून विकासनगरला निघाले होते. त्याचवेळी पुणे येथील एका ट्रान्स्पोर्ट कंपनीचा आयशर टेम्पो (एमएच १२ एनएक्स ४१६४) डेक्कन चौकातून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या दिशेने येत होता. त्यावेळी नवनाथ याच्या मोपेडला ओव्हरटेक करताना क्लिनरच्या बाजूने धडक दिली. त्यामुळे मोपेड घसरून आयशर टेम्पोच्या पाठीमागील चाकाखाली गेली. त्यामध्ये टेम्पोचे चाक नवनाथ याच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला, तर गणेश हा जखमी झाला.

घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी गणेशला खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर टेम्पोचालकाने घटनास्थळावरून पलायन केले.

अपघाताची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जीवनमुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मृतदेह इंदिरा गांधी रुग्णालयात विच्छेदनासाठी नेला. पोलिसांनी पंचनामा करून अपघातग्रस्त टेम्पो व चालक पांडुरंग भरत साठे (रा. खटाव, जि. सातारा) याला ताब्यात घेतले. घटनास्थळी नातेवाइकांनी मोठा आक्रोश केला. नवनाथ हा इचलकरंजी भाजप शहर उपाध्यक्ष राजाराम पोवार यांचा मुलगा आहे. नवनाथ याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन लहान मुले, भाऊ असा परिवार आहे. मुख्य मार्गावर घटना घडल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

चौकट

अरुंद रस्ता; मोठ्या प्रमाणात वाहतूक

या मार्गावर नेहमीच रहदारी मोठ्या प्रमाणात असते. त्यातच गॅस पाईपलाईनची खोदाई केलेली आहे. त्या परिसरात असलेल्या रिक्षा खोदाईमुळे आणखीन रस्त्यावर लावल्या जातात. परिणामी रस्ता अरुंद बनला आहे. या चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. परंतु तेथे वाहतूक पोलीस कधीतरच आढळतात; अन्यथा नियमितपणे रामभरोसे वाहतूक सुरू असते.

फोटो ओळी

०६०७२०२१-आयसीएच-०२-नवनाथ पोवार

Web Title: Vaifani professional killed in Eicher tempo collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.