वैकुंठ मेहता सहकारी संस्थेच्या अधिकाऱ्यांची श्रीराम संस्थेस अभ्यासभेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:21 AM2021-02-07T04:21:35+5:302021-02-07T04:21:35+5:30
येथील श्रीराम सेवा संस्था ही सहकार क्षेत्रातील अद्ययावत सेवा देणारी व आशिया खंडात नावाजलेली सहकारी संस्था आहे. संस्थेच्या ...
येथील श्रीराम सेवा संस्था ही सहकार क्षेत्रातील अद्ययावत सेवा देणारी व आशिया खंडात नावाजलेली सहकारी संस्था आहे. संस्थेच्या विविध शाखांच्या माध्यमातून कामकाजाचे जाळे विखुरलेले आहे. या संस्थेस देशभरातील अनेक सहकारी संस्था भेट देऊन कामकाजाची पाहणी करीत असतात. त्याअंतर्गत वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन, पुणे या संस्थेचे प्रकल्प संचालक वाय. ए. पाटील व प्रशिक्षण केंद्र सल्लागार डी. रवी यांनी बुधवारी भेट दिली. संस्थेचे ज्येष्ठ संचालक राजीव चव्हाण यांनी संस्थेच्या प्रगतीबाबतची माहिती दिली. यावेळी सभापती धनाजी गोडसे, उपसभापती संतोष ठाणेकर, संचालक विलास पिंगळे, संचालक हरी पाटील, मदन जामदार, प्रमोद पाटील, प्रशांत पाटील, प्रवीण लाड, संतोष पाटील, संजय केंबळे, कुंडलिक परीट, सुधाकर कसबेकर, जया उलपे, वनिता बेडेकर, नंदिनी रणदिवे, व्यवस्थापक शरदचंद्र उलपे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.