‘मॅजिक स्क्वेअर’ बनवून विश्वविक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:21 AM2020-12-08T04:21:52+5:302020-12-08T04:21:52+5:30
कोल्हापूर : जगातील सर्वांत मोठ्या मॅजिक स्क्वेअरची निर्मिती करून विश्वविक्रम केला असल्याची माहिती सुरेश सुतार यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
कोल्हापूर : जगातील सर्वांत मोठ्या मॅजिक स्क्वेअरची निर्मिती करून विश्वविक्रम केला असल्याची माहिती सुरेश सुतार यांनी पत्रकार परिषदेत दिली. ओएमजी बुक ऑफ रेकाॅर्डसमध्ये याची नोंद झाली असून, जर्मनीचे रेकॉर्ड ब्रके केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुतार म्हणाले, जपानमध्ये १५ व्या शतकात मॅजिक स्क्वेअरची निर्मिती झाली. पहिला विश्वविक्रमही याचवेळी नोंदविला गेला. यामध्ये २०१२ मध्ये जर्मनीमध्ये पीटर वेबर व तसिलो हेरबीक यांनी आतापर्यंत सर्वांत मोठा ३५५९ बाय ३५५९ इतक्या संख्यांचा मॅजिक स्क्वेअर बनविला होता. यानंतर कोल्हापुरातील नऊजणांच्या टीमने एकत्र येऊन ४०९६ बाय ४०९६ इतक्या संख्यांचा मॅजिक स्क्वेअर बनवून जर्मनीचा रेकॉर्ड ब्रेक केले. यामध्ये १ पासून १ कोटी ६७ लाख ७७ हजार २१६ एवढे अंक वापरले आहेत. ८ बाय ८ चे चौकोन असून, त्यांची संख्या २ लाख ६२ हजार १४४ इतकी आहे. यामध्ये एका चौकाेनाची उभी, आडवी व तिरपी बेरीज ६ कोटी ७१ लाख ८ हजार ८६८ अशी आहे. याची दखल घेत जागतिक संविधान संघ यांचा पुरस्कार मिळाला आहे. यावेळी अमर सनगर, मनोज चौगुले, नितीन पाटील, अनिकेत सुतार, गायत्री पाटील, सोनाली पाटील, आदी उपस्थित होते.
मॅजिक स्क्वेअर म्हणजे काय
एका चौकोनामध्ये असणाऱ्या अंकाची आडवी, उभी व तिरपी बेरीज एकसारखी येणे.
बातमीदार : विनोद