नेसरीच्या वैशाली सुतार झाल्या जटामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:21 AM2021-01-04T04:21:57+5:302021-01-04T04:21:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नेसरी : नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील वैशाली सुनील सुतार यांना गडहिंग्लज अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जटामुक्त केले. ...

Vaishali carpenters of Nesari became hairless | नेसरीच्या वैशाली सुतार झाल्या जटामुक्त

नेसरीच्या वैशाली सुतार झाल्या जटामुक्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नेसरी : नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील वैशाली सुनील सुतार यांना गडहिंग्लज अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जटामुक्त केले. नेसरी परिसरातील हे सोळावे जटानिर्मूलन आहे.

सुतार या गेल्या ७ वर्षांपासून जटेसह वावरत होत्या. जटा वाढल्याने मानेवर ताण येऊन त्यांना मानेचा त्रास सुरू झाला होता. देवीचा त्रास होईल, या भीतीने त्या जटामुक्त होण्यास घाबरत होत्या. मात्र, ‘अंनिस’चे कार्यकर्ते व चुलत भाऊ सुभाष सुतार यांनी त्यांचे प्रबोधन करून त्यांना जटामुक्त केले.

जटा निर्मूलनानंतर वैशाली यांचा प्रज्ञा भोईटे यांच्या हस्ते साडी-चोळी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाश भोईटे, सुभाष कोरे, पांडुरंग पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा अलका भोईटे, इंजिनिअर प्रज्ञा भोईटे, सुनील सुतार, सुभाष सुतार, शुभांगी सुतार आदी उपस्थित होते.

------------------------

फोटो ओळी : नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे जटा निर्मूलनानंतर वैशाली सुतार यांचा प्रज्ञा भोईटे यांनी साडी-चोळी देऊन सत्कार केला. यावेळी प्रकाश भोईटे, अलका भोईटे, पांडुरंग पाटील, शुभांगी सुतार, सुभाष कोरे आदी उपस्थित होते. (आशपाक किल्लेदार)

क्रमांक : ०३०१२०२१-गड-१०

Web Title: Vaishali carpenters of Nesari became hairless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.