Valentine Day: लव्ह की ॲरेंज?... संभाजीराजेंनी सांगितलीय 'प्यारवाली लव्हस्टोरी'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 10:41 AM2023-02-13T10:41:12+5:302023-02-13T10:45:01+5:30
तसं पाहिलं तर माझं लग्न ॲरेंजच आहे, पण त्यातही लव्हस्टोरी आहे. आता तुमचं वय २४ झालं असल्यानं लग्न करायला हवं, असं आमच्या वडिलांनी सांगितलं होतं.
संभाजीराजे छत्रपती, माजी खासदार
प्यारवाली लव्हस्टोरी सर्वांचीच असते. पण, कुणाचं प्रेम हे लग्नाअगोदर सुरू झालेलं असतं. तर कुणाचं प्रेम हे लग्नानंतर सुरू होतं. लग्नाअगोदरच्या प्रेमाला लव्हमॅरेज असं म्हणतात. प्रेमप्रकरणातून न झालेल्या किंवा कुटुंबीयांनी पै पाहुण्यांच्या मर्जीतून जमवलेल्या लग्नाला अरेंज मॅरेज असं म्हणतात. मात्र, दोन्ही लग्नामध्ये प्रेम हा धागा कॉमन राहतो. प्रेम हे राजकारण्यांनाही होऊ शकतं. राजकारण्यांचीही प्यारवाली लव्ह स्टोरी असू शकते. माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलीय प्यारवाली लव्ह स्टोरी.
तसं पाहिलं तर माझं लग्न ॲरेंजच आहे, पण त्यातही लव्हस्टोरी आहे. आता तुमचं वय २४ झालं असल्यानं लग्न करायला हवं, असं आमच्या वडिलांनी सांगितलं होतं. वडिलांनी सांगितलं की, तुम्ही तुमचा टाइम स्पॅन घ्या. तुमचं काय लक असेल ते असेल, पण यावर्षी तुम्ही वधू सिलेक्ट करा. मी आमच्या नागपूरकर कल्पनाराजेंना सांगितलं की, मला संयोगीताराजे आवडल्या आहेत, पण नंतर समजलं की त्यांचं वय कमी आहे. त्यामुळे मी त्यांच्यासाठी थांबलो. त्यादरम्यानच्या काळात मला लग्नाची बरीच प्रपोजल्स आली, पण एकही आवडलं नाही. वडिलांनी दिलेल्या मुदतीत संयोगीताराजेंना १८ वर्षे पूर्ण होणार होती. लग्नाच्या वेळी माझं वय २४ होतं. आम्हा दोघांमध्ये सात वर्षांचा गॅप आहे. आमचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर जानेवारीत त्यांना १८ वर्षे पूर्ण झाली आणि फेब्रुवारीत संयोगीताराजेंशी आमचं लग्न झालं.