जिरगे तिकटी येथे व्हॅल्वमध्ये बिघाड, परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 06:12 PM2020-05-29T18:12:41+5:302020-05-29T18:14:59+5:30
जिरगे तिकटी येथील मुख्यपाईपलाईनवरील व्हॉल्वमध्ये बिघाड झाल्याने परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्ण बंद आहे. आज, शनिवारी काम पूर्ण होणार असून रविवारपासून पाणीपुरवठा पूर्वपदावर येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
कोल्हापूर : जिरगे तिकटी येथील मुख्यपाईपलाईनवरील व्हॉल्वमध्ये बिघाड झाल्याने परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्ण बंद आहे. आज, शनिवारी काम पूर्ण होणार असून रविवारपासून पाणीपुरवठा पूर्वपदावर येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
जिरगे तिकटी येथील मुख्यपाईपलाईनमधून शहरातील बहुतांशी परिसरात पाणीपुरवठा होतो. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात पाण्याची समस्या निर्माण झाली होती.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तपासणी केली असता जिरगे तिकटी येथील मुख्यलाईनवरील व्हॉल्वमध्ये बिघाड झाल्याचे आढळून आले. पाणीपुरवठा विभागाकडून व्हॉल्व दुरुस्तीचे काम सुरु आहे. मुख्यपाईपलाईनवरुन पाणीपुरवठा होणाय्रा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पाणी टंचाई आहे.