वाळवे खुर्दची देवदीपावली उत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:22 AM2020-12-08T04:22:54+5:302020-12-08T04:22:54+5:30
वाळवे खुर्द (ता. कागल ) येथे १५ डिसेंबर रोजी साजरी होणारी ग्रामदैवत हनुमान देवालयाची देवदीपावली कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर ...
वाळवे खुर्द (ता. कागल ) येथे १५ डिसेंबर रोजी साजरी होणारी ग्रामदैवत हनुमान देवालयाची देवदीपावली कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर रद्द केली आहे.
ग्रामस्थांनी गाव बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत बिद्री साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब पाटील, माजी जि. प. सदस्य भूषण पाटील उपस्थित होते.
गेली अनेक वर्षांपासून चालत आलेली धाकटी दीपावली सर्वांना प्रचलित आहे. मुख्य दीपावलीनंतर अवघ्या एक माहिन्यानंतर मार्गशीर्ष शु, प्रतिपदेला ही देवदीपावली म्हणजे (धाकटी) दीपावली येथे या ठिकाणचे ग्रामदैवत हे जागृत देवस्थान आहे. या ठिकाणी लहान-मोठे स्टॉल उभे केले जातात. त्याचबरोबर सायंकाळी मुख्य देवाची पालखी सोहळ्यावेळी मोठी आतषबाजी व मोठी गर्दी होते. मात्र, यावेळी हे सर्व कार्यक्रम कोरोनामुळे रद्द करण्यात आले आहेत.
बैठकीस एन. एस. पाटील, सीताराम शेणवी, टी. एन. पाटील, डॉ. डी. आर. कुंभार, बाळासो पाटील, साताप्पा पाटील, प्रशासक आधिकारी, पोलीसपाटील, ग्रामस्थ उपस्थित होते.