'वंचित'कडून कोल्हापुरात शाहू महाराजांना पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 05:46 PM2024-03-23T17:46:05+5:302024-03-23T17:48:24+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडीचा जागा वाटपातील तिढा ...
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडीचा जागा वाटपातील तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेत शाहू महाराजांना पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
VBA will give its full support to Shahu Maharaj Chhatrapati from Kolhapur Lok Sabha constituency.
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) March 23, 2024
VBA believes in and is a major proponent of the Phule-Shahu-Ambedkar ideology, and we have immense respect for the descendants of Chhatrapati Shahu Maharaj of Kolhapur.
दरम्यान, शाहू महाराज यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्विट करून समतेचा विचार आणि संविधान टिकवण्यासाठी आपला पाठिंबा आम्हांला निश्चितच बळ देईल, असे म्हटले आहे.
आदरणीय श्रीमंत @ShahuChhatrpati यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याबद्दल @Prksh_Ambedkar जी आपले धन्यवाद . समतेचा विचार आणि संविधान टिकवण्यासाठी आपला पाठिंबा आम्हांला निश्चितच बळ देईल.तसेच राज्यात महाविकास आघाडीतही आपण सहभागी व्हावे, ही अपेक्षा. @INCIndia@INCMaharashtra
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) March 23, 2024
महायुतीचे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेचे उमेदवार जाहीर होत नसल्याने नेते आणि कार्यकर्ते अस्वस्थ असल्याचे चित्र आहे. एकीकडे कोल्हापूरमधून शाहू छत्रपती यांनी प्रचाराला सुरुवातच केली असताना दुसरीकडे दिल्लीतून नावे कधी जाहीर होणार, यांची महायुतीच्या कार्यकर्त्यांना प्रतीक्षा आहे. दरम्यान, खासदार संजय मंडलिक हे मुंबईत तळ ठोकून असून, धैर्यशील माने हे मात्र शुक्रवारी सकाळी कोल्हापुरात येऊन त्यांनी मतदारसंघात गाठीभेटी सुरू केल्या आहेत.