वंदना जाधव, शिवानी भोसले, कोमल मिसाळ निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:26 AM2021-07-14T04:26:50+5:302021-07-14T04:26:50+5:30
कोल्हापूर : आज होणाऱ्या सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वंदना जाधव, शिवानी भोसले आणि कोमल मिसाळ या ...
कोल्हापूर : आज होणाऱ्या सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वंदना जाधव, शिवानी भोसले आणि कोमल मिसाळ या तीन जिल्हा परिषद सदस्यांची सभापतिपदे निश्चित मानली जात आहेत. एका पदासाठी अपक्ष रसिका पाटील आणि चंदगड तालुक्यातील सदस्य कल्लाप्पा भोगण यांच्यात रस्सीखेच सुरू आहेत. यावर मंगळवारीच निर्णय होण्याची शक्यता आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सर्व सदस्य पुन्हा पन्हाळ्यावर गेले. गेल्यावर्षी ठरल्याप्रमाणे शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून दोन्ही वर्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नावांची यादी असलेले पत्र देण्यात आले होते. त्यानुसार आबिटकर समर्थक वंदना जाधव आणि मंडलिक समर्थक शिवानी भोसले यांची पदे निश्चित आहेत. शिवसेनेच्या पत्रात समाजकल्याण पदासाठी कोमल मिसाळ आणि मनीषा कुरणे अशी दोन्ही नावे देण्यात आली होती. मात्र, चंद्रदीप नरके यांनी मात्र मिसाळ यांचे नाव निश्चित केले आहे.
चौथे समिती सभापतिपद हे सतेज पाटील ठरवणार आहेत. त्यांच्यासमोर अपक्ष शिंगणापूरच्या रसिका पाटील यांचे नाव आहे. महिला बालकल्याण समितीसाठी हे नाव निश्चित होण्याची शक्यता असली तरी चंदगड तालुक्यातून नुकतेच कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेले कल्लाप्पा भोगण यांनीही सभापतिपदावर दावा केल्याने याचा निर्णय मंगळवारी होणार आहे. भोसले यांना शिक्षण तर जाधव यांना बांधकाम समिती मिळण्याची शक्यता आहे.