शिस्तबद्ध तरुणाई घडविण्यासाठी विविध उपक्रम राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:54 AM2021-09-02T04:54:10+5:302021-09-02T04:54:10+5:30

कोल्हापूर : शिस्तबद्ध, समृद्ध व्यक्तिमत्त्वाचा आणि राष्ट्रभक्तीने भारलेली तरुणाई घडविण्यासाठी राष्ट्रीय छात्रसेनेच्या (एनसीसी) माध्यमातून विविध नावीन्यपूर्ण, प्रेरणादायी उपक्रम राबविणार ...

Various activities will be implemented to create disciplined youth | शिस्तबद्ध तरुणाई घडविण्यासाठी विविध उपक्रम राबविणार

शिस्तबद्ध तरुणाई घडविण्यासाठी विविध उपक्रम राबविणार

googlenewsNext

कोल्हापूर : शिस्तबद्ध, समृद्ध व्यक्तिमत्त्वाचा आणि राष्ट्रभक्तीने भारलेली तरुणाई घडविण्यासाठी राष्ट्रीय छात्रसेनेच्या (एनसीसी) माध्यमातून विविध नावीन्यपूर्ण, प्रेरणादायी उपक्रम राबविणार भर राहणार असल्याचे एनसीसीच्या कोल्हापूर गट मुख्यालायचे नूतन ग्रुप कमांडर ब्रिगेडिअर समीर साळुंखे यांनी बुधवारी सांगितले.

कोल्हापूर गट मुख्यालयात रुजू झाल्यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. जगातील सर्वोत्तम नागरिक घडविण्याची क्षमता एनसीसी प्रशिक्षणात आहे. सक्षम, शिस्तबद्ध युवा वर्गाची जडणघडण हे सांघिक स्वरूपाचे काम आहे. त्यासाठी शासनाचे सहकार्य, अधिकाऱ्यांचे योगदान, छात्रसौनिकांचा मनापासून सहभाग, समाजाची चांगल्या उपक्रमांना शाबासकीची थाप आवश्यक आहे. एनसीसी कोल्हापूर गट मुख्यालयाच्या कार्यक्षेत्रात प्रेरणादायी संवाद, साहसी, समाजसेवेचे उपक्रमासह तरुणांचे व्यक्तिमत्त्व सर्वगुणसंपन्न होण्यासाठी विविध कृतिशील मोहिमा यावर भर राहील. सामाजिक उपक्रमामध्ये योगदान देण्यात येईल, असे ब्रिगेडिअर साळुंखे यांनी सांगितले. एनसीसीच्या ऑनररी मेजर प्रा. डॉ. रूपा शहा यांनी पुष्पगुच्छ देऊन ब्रिगेडिअर साळुंखे यांचे स्वागत केले. यावेळी ट्रेनिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सुनील कुमार उपस्थित होते.

चौकट

लक्षणीय कामगिरी

ब्रिगेडिअर साळुंखे हे मूळचे पुणे येथील आहेत. त्यांनी भारतीय सेनादलात सेवा देताना जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधी मोहिमांमध्ये सहभाग घेतला. श्रीलंकेत शांतीसेनेचे अधिकारी म्हणून त्यांनी लक्षणीय कामगिरी बजावली. वडिलांनी सेवा बजावलेल्या इन्फंट्री बटालियनमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली.

फोटो (०१०९२०२१-कोल-समीर साळुंखे एनसीसी) : कोल्हापुरात बुधवारी एनसीसीच्या कोल्हापूर गट मुख्यालायचे नूतन ग्रुप कमांडर ब्रिगेडिअर समीर साळुंखे यांनी संवाद साधला. यावेळी शेजारी ऑनररी मेजर प्रा. डॉ. रूपा शहा उपस्थित होत्या.

010921\01kol_37_01092021_5.jpg

फोटो (०१०९२०२१-कोल-समीर साळुंखे एनसीसी) : कोल्हापुरात बुधवारी  एनसीसीच्या कोल्हापूर गटमुख्यालायचे नूतन ग्रुपकमांडर ब्रिगेडिअर समीर साळुंखे यांनी संवाद साधला. यावेळी शेजारी ऑनररी मेजर प्रा. डॉ. रूपा शहा  उपस्थित होत्या.

Web Title: Various activities will be implemented to create disciplined youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.