विविध आंदोलने, उत्सव काळातील गुन्हे घेणार मागे, गृहविभागाचा निर्णय; पण..
By समीर देशपांडे | Published: September 20, 2022 05:43 PM2022-09-20T17:43:33+5:302022-09-20T17:44:18+5:30
त्यासाठी उच्च पोलिस अधिकाऱ्यांच्या समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.
कोल्हापूर : राज्यात विविध राजकीय आणि सामाजिक आंदोलनामध्ये, कोरोना काळामध्ये आणि गणेशोत्सव, दहीहंडी उत्सवावेळी ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत अशा सर्वांचे गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. त्यासाठी उच्च पोलिस अधिकाऱ्यांच्या समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.
दोन वर्षांच्या कोरोना काळात नागरिकांकडून अनेक ठिकाणी आंदोलने झाली. याबद्दल जे गुन्हे दाखल झाले आहेत. ते मागे घेण्यात आले आहेत. मात्र शासकीय कर्मचाऱ्यांऱ्यांवरील हल्ले, ५० हजार रूपयांवर झालेले सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान याबाबतचे गुन्हे मात्र मागे घेता येणार नाहीत.
तसेच ३१ मार्च २०२२ पर्यंत सामाजिक आणि राजकीय आंदोलनातील आणि गतवर्षी दहीहंडी आणि गणेशोत्सव या काळात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. अशांवरील गुन्हेही मागे घेण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे.