मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी विविध प्रयोग व्हावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:32 AM2021-02-27T04:32:10+5:302021-02-27T04:32:10+5:30

मराठी चित्रपटांबाबत विचार गरजेचा न्यूयॉर्क शहरात १९३ भाषा लिहिता-वाचता येणारे, तर ८०० बोलीभाषा बोलणारे लोक राहतात. जगभरातील सांस्कृतिक, साहित्यिक ...

Various experiments should be done to enrich the Marathi language | मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी विविध प्रयोग व्हावेत

मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी विविध प्रयोग व्हावेत

googlenewsNext

मराठी चित्रपटांबाबत विचार गरजेचा

न्यूयॉर्क शहरात १९३ भाषा लिहिता-वाचता येणारे, तर ८०० बोलीभाषा बोलणारे लोक राहतात. जगभरातील सांस्कृतिक, साहित्यिक आदान-प्रदानाचे ते केंद्रच बनले आहे. दाक्षिणात्य प्रादेशिक भाषांतील चित्रपट जगाची भाषा बोलत असून, त्यांची स्वीकारार्हता वृद्धिंगत करताना त्यांच्या तुलनेत मराठी चित्रपट कमी पडताहेत का? याचा विचार करण्याची गरज असल्याचे संपादक भोसले यांनी सांगितले.

चौकट

कुस्ती, चित्रपटांचा इतिहास विद्यापीठाने लिहावा

कोयना प्रकल्पाच्या निर्मितीवर पुस्तक लिहिण्याचे काम डॉ. शिंदे यांनी करावे. कोल्हापुरी कुस्ती आणि मराठी चित्रपटांच्या इतिहासाचे लेखन विद्यापीठाकडून व्हावे, असे संपादक भोसले यांनी यावेळी सुचविले. याबाबत विद्यापीठ निश्चितपणे विचार करेल, असे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले.

फोटो (२६०२२०२१-कोल-मराठी विभाग कार्यक्रम) : कोल्हापुरात शुक्रवारी शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागातर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शासनाच्या उत्कृष्ट वाङ्‌मयनिर्मिती पुरस्कार विजेते डॉ. व्ही. एन. शिंदे आणि दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांचा ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डावीकडून डॉ. नंदकुमार मोरे, रणधीर शिंदे, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के उपस्थित होते.

Web Title: Various experiments should be done to enrich the Marathi language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.