कोरोनाला थोपविण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:18 AM2021-04-29T04:18:42+5:302021-04-29T04:18:42+5:30
कोरोनाचा प्रसार वाढत असून, सध्या शहर व परिसरातील विविध भागांमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. दररोज नवनवीन प्रभागात रुग्ण ...
कोरोनाचा प्रसार वाढत असून, सध्या शहर व परिसरातील विविध भागांमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. दररोज नवनवीन प्रभागात रुग्ण सापडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एखाद्या घरातील रुग्ण आढळल्यास भागामध्ये सर्वत्र कोरोना पसरेल, अशी भीती नागरिकांना वाटत आहे. यामुळे नागरिकांचा रोष व्यक्त होत असून, अनेकांकडून औषध फवारणीसाठी दबाव येत आहे. त्यानुसार संबंधित प्रभागातील लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते औषध फवारणी करून घेत आहेत. औषध फवारणी करून प्रत्येक विभागाचे निर्जंतुकीकरण केले जात आहे.
प्रशासनही कोरोनाला रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. तसेच लसीकरणही सुरू करण्यात आले आहे. रुग्ण वाढत असल्याने नगरपालिका प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रभागामध्ये औषध फवारणी करून भागाचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. वर्षअखेरीस नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुका होण्याची शक्यता असल्याने भागातील लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
फोटो ओळी
२८०४२०२१-आयसीएच-०२
इचलकरंजीत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रभागामध्ये औषध फवारणीचे काम सुरू आहे.