शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ६ जूनला विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:20 AM2021-05-30T04:20:13+5:302021-05-30T04:20:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मराठा महासंघाने रविवारी (दि.६) जूनला होणारा शिवराज्याभिषेक दिन कोरोना सुरक्षा सेवा ...
लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मराठा महासंघाने रविवारी (दि.६) जूनला होणारा शिवराज्याभिषेक दिन कोरोना सुरक्षा सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. याबाबतची बैठक शनिवारी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. अध्यक्षस्थानी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक होते.
गेल्या वीस वर्षांपासून हा दिवस मोठ्या दिमाखदार पद्धतीने साजरा केला जातो. मागील वर्षांपासून कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम थोडक्यात घेण्यात आला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यात शासकीय पातळीवर स्वराज्य दिन म्हणून जाहीर केला. यासोबतच नामंवत संशोधकांची व्याख्याने आयोजित केली जात होती. यंदा मात्र, त्याला फाटा देण्यात आला आहे. या दिवशी शिवरायांच्या राज्याभिषेक दिनाचे मोल व महत्त्व सांगणारे लेख सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध केले जाणार आहे. याशिवाय १ ते ६ जून या दरम्यान सीपीआरसह अन्य कोविड सेंटरला वैद्यकीय साहित्य वाटप केले जाणार आहे. बाल संकुलमधील मुलींना फळे व छत्रपती शिवरायाचे पुतळे घडविणारे रस्त्यावरील कारागिरांना धान्य वाटप केले जाणार आहे. निराधार, बेघर, झोपडपट्टीतील गरीब ५०० जणांना अन्नदान केले जाणार आहे. ६ जूनला छत्रपती शिवाजी चौकातील पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते पूजन केले जाणार आहे.