वारणा नदी आमच्याच मालकीची

By admin | Published: June 5, 2017 01:16 AM2017-06-05T01:16:58+5:302017-06-05T01:16:58+5:30

वारणा नदी आमच्याच मालकीची

Varna river belongs to us | वारणा नदी आमच्याच मालकीची

वारणा नदी आमच्याच मालकीची

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
दानोळी : वारणा नदी ही आमच्याच मालकीची असून, इचलकरंजीला पाण्याचा एकही थेंब न देण्याच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. वारणा नदीकाठावरील प्रत्येक गावात बैठक घेऊन या योजनेचे गांभीर्य पटवून देणार आहे. असून, आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशारा वारणा कृती समितीने येथे दिला.
आमदार सुरेश हाळवणकर यांनी गावातून नदी गेली म्हणजे मालक झाला काय या वक्तव्यास प्रत्युत्तर म्हणून रविवारी दानोळी येथे वारणा बचाव कृती समितीची बैठक झाली. या बैठकीत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भूमिका जाहीर केली.
यावेळी समितीचे कार्याध्यक्ष सर्जेराव शिंदे म्हणाले, नदी काठावरील गावांनी गावठाणची जमीन आणि शेतकऱ्यांनी वडिलार्जित जमिनी देऊन धरणग्रस्तांचे पुनर्वसन केले आहे. त्यामुळे वारणा नदी आमच्याच मालकीची आहे.
वारणा बचाव कृती समितीचे अध्यक्ष महादेव धनवडे म्हणाले, ही योजना अनैसर्गिक असून, ती रद्द होईपर्यंत लढणार असून, त्यासाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील वारणा नदीकाठावरील प्रत्येक गावात बैठक घेऊन या योजनेचे गांभीर्य पटवून देणार असून, आंदोलन आणखी तीव्र करणार आहे. याची सुरुवात आज, सोमवारपासून कोथळी, कवठेसार, हिंगणगाव, कुंभोज गावांत बैठकी घेणार आहे.
सध्या शहरास पाणीपुरवठा होत असलेल्या पंचगंगा नदी आणि कृष्णा नदीस एकूण आठ नद्या मिळाल्या आहेत. अशा आठ नद्यांचे पाणी घेऊन सुद्धा थेट वारणेतून पाणी कशासाठी यासह सध्याची पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाल्याचे सांगत असून, ती मुदतीपूर्व कालबाह्य झालीच कशी? यापूर्वी कालव्यामुळे फार मोठे नुकसान होणार असे सांगून कालवाही नको व वारणेचे पाणीही नको, अशी भूमिका इचलकरंजी शहराने घेतली होती. आता ते कोणत्या हक्काने पाणी मागतात, असे अनुत्तरित मुद्दे समितीचे उपाध्यक्ष केशव राऊत, बापूसो दळवी, मानाजी भोसले यांनी मांडले.
दिवसाकाठी सोळा तासांचा पाणी उपसा परवाना आहे. पण, सध्या केवळ आठ तास वीज मिळते. भविष्यात महावितरणला अच्छे दिन आले तर सोळा तास पाणी उपसा करण्यात येईल. त्यावेळी आमच्या कोरड्या जमिनीस आम्हालाच पाणी दुसरीकडून आणावे लागेल, असे मत समितीने मांडले.
बैठकीस उपसरपंच गब्रू गावडे, सुरेश कांबळे, संदीप हवालदार, सतीश मलमे, जंबू सकाप्पा, गुंडू दळवी, प्रवीण पवार, सुरेश माणगावे, उमेश केकले, सातगोंडा पाराज, अशोक आनंदा, धन्यकुमार भोसले, उदय होगले, रावसो खिचडे, प्रवीण पोवार, वसंत पिसे, अरुण होगले, दत्ता राजमाने, आदी उपस्थित होते.
हाळवणकरांना राजकीय लाभ
मंत्री असताना प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी शहरास वारणेतून पाणी आणू असा विचार मांडला होता. पण, त्यावेळी हाळवणकरांनी काळम्मावाडीतून थेट पाईपलाईन करण्याचा प्रस्ताव मांडला होता. आता हाळवणकर आमदार असताना तेच पुन्हा वारणेतून पाणी नेण्यासाठी आक्रमक झाले आहेत. यावरून आमदार हाळवणकरांचे राजकीय लाभ दिसून येत आहेत.

Web Title: Varna river belongs to us

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.