वसंत बाबर यांची पिंपरी-चिंचवड तर सुनील पाटील नवी मुंबईला बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 03:10 PM2020-10-30T15:10:26+5:302020-10-30T15:12:18+5:30
police, transfar, kolhapurnews राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश पोलीस महासंचालकांनी गुरुवारी रात्री काढले. कोल्हापुरातील शहर वाहतूक शाखेचे वसंत बाबर यांची पिंपरी-चिंचवड येथे तर करवीर पोलीस ठाण्यातील सुनील पाटील यांची नवी मुंबई येथे बदली झाली शिवाय कोल्हापूर वायरलेस शाखेतील रियाज अहमद लालेमहमद शेख यांची सांगली येथे बदली झाली आहे.
कोल्हापूर : राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश पोलीस महासंचालकांनी गुरुवारी रात्री काढले. कोल्हापुरातील शहर वाहतूक शाखेचे वसंत बाबर यांची पिंपरी-चिंचवड येथे तर करवीर पोलीस ठाण्यातील सुनील पाटील यांची नवी मुंबई येथे बदली झाली शिवाय कोल्हापूर वायरलेस शाखेतील रियाज अहमद लालेमहमद शेख यांची सांगली येथे बदली झाली आहे.
याशिवाय इतर जिल्ह्यांतील पाच पोलीस निरीक्षकांच्या बदल्या कोल्हापुरात झाल्या आहेत. यामध्ये राज्य गुप्त वार्ता (सीआयडी)चे संतोष श्रीमंत पाटील, ठाणे शहरातील रमेश तुकाराम काटकर, पोलीस प्रशिक्षण विभाग मरोळचे भैरू अंतू तळेकर, मुंबई शहर येथून संतोष जाधव, बीड येथून रमेश रामकृष्ण मोरे यांचा कोल्हापुरात बदली झालेल्यामध्ये समावेश आहे.
गुरुवारी रात्री उशिरा हे बदलींचे आदेश निघाले. बदली झालेल्यांना तत्काळ कार्यमुक्त करावे, पर्यायी बदलीवर येणाऱ्या पोलीस निरीक्षकांची वाट पाहू नये, असेही आदेशात पोलीस महासंचालकांनी म्हटले आहे.