वसंतराव चौगुले चषक ‘क्लॅक्स सोल्यूशन’ कडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:24 AM2021-04-02T04:24:14+5:302021-04-02T04:24:14+5:30

कोल्हापूर : ‘केडीसीए’तर्फे आयोजित केलेल्या वसंतराव चौगुले चषक ‘ब’ गट क्रिकेट स्पर्धेत क्लॅक्स सोल्यूशन मयूर स्पोर्टस् ॲकॅडमीने मंगलमूर्ती क्रिकेट ...

Vasantrao Chowgule Cup to 'Clax Solution' | वसंतराव चौगुले चषक ‘क्लॅक्स सोल्यूशन’ कडे

वसंतराव चौगुले चषक ‘क्लॅक्स सोल्यूशन’ कडे

Next

कोल्हापूर : ‘केडीसीए’तर्फे आयोजित केलेल्या वसंतराव चौगुले चषक ‘ब’ गट क्रिकेट स्पर्धेत क्लॅक्स सोल्यूशन मयूर स्पोर्टस् ॲकॅडमीने मंगलमूर्ती क्रिकेट ॲकॅडमीचा पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली.

राजाराम काॅलेज मैदानावर गुरुवारी झालेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना क्लॅक्स सोल्यूशनने ३८.१ षटकांत सर्वबाद १७७ धावा केल्या. यात रेहान नसदी ४७, जयदीप पाटील ३४, प्रकाश केसरकर २१, प्रसाद पाटील याने १८ धावा केल्या. मंगलमूर्तीकडून सुरेश सातपुतेने चार, प्रकाश सातपुते व अनिल माळी यांनी प्रत्येकी दोन आणि वैभव नलवडे, सखाराम माळी यांनी प्रत्येकी एक बळी ोघेतला. उत्तरादाखल खेळताना मंगलमूर्ती संघाचा डाव ३७.३ षटकांत सर्वबाद १६४ धावांत आटोपला. यात सुरेश सातपुते ५१, शैलेश थोरात २७, वैभव नलवडे २२, प्रवीण होवाळ २० धावा केल्या. क्लॅक्सकडून नझीर शेखने पाच, प्रसाद पाटील, बाबजी सनदी यांनी प्रत्येकी एक बळी घेत मंगलमूर्ती संघास विजयापासून वंचित ठेवले.

विजयी संघात बाबजी सनदी (कर्णधार), चेतन शिंगटे, जयदीप पाटील, कपिल धर्माधिकारी, मुकुल शहा, नझीर शेख, प्रकाश केसरकर, प्रसाद पाटील, रेहान सनदी, रोहित उंडाळे, शिवकुमार यादव, वैभव पाटील यांचा समावेश आहे.

फोटो : ०१०४२०२१-कोल-क्रिकेट

आेळी : केडीसीएतर्फे आयोजित केलेल्या वसंतराव चौगुले चषक ब गट क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकाविलेला क्लॅक्स सोल्यूशन मयूर स्पोर्टस् ॲकॅडमीचा संघ.

Web Title: Vasantrao Chowgule Cup to 'Clax Solution'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.