घेता का विस्कटू ;कवडीमोलाने भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:51 AM2019-01-30T00:51:54+5:302019-01-30T00:51:58+5:30

कोल्हापूर : मेथीच्या चार पेंढ्या १0 रुपयांना , कोथिंंबिरीच्या दोन पेंढ्या पाच रुपयांना, कोबी फ्लॉवरचा किलोचा गड्डा १0 रुपयांना, ...

Vectuo of Ghettu; Kawidimolane Vegetable | घेता का विस्कटू ;कवडीमोलाने भाजीपाला

घेता का विस्कटू ;कवडीमोलाने भाजीपाला

Next

कोल्हापूर : मेथीच्या चार पेंढ्या १0 रुपयांना , कोथिंंबिरीच्या दोन पेंढ्या पाच रुपयांना, कोबी फ्लॉवरचा किलोचा गड्डा १0 रुपयांना, वांगी २0 रुपये किलो....हे दर आहेत, कोल्हापुरातील या आठवड्यातील भाजीपाल्याचे. घसरलेले दर पाहून घासाघीस करणाऱ्या ग्राहकालाही भाजीपाला घेताना लाज वाटू लागली आहे. कष्टाने पिकविलेला माल कवडीमोल दराने विकावा लागत असल्याने उत्पादक शेतकºयांच्याही डोळ्यांत अश्रू दाटले आहेत. मिळणाºया दरातून उत्पादनखर्च राहूदे वाहतुकीचाही खर्च निघत नसल्याने शेतकºयांचे अर्थकारणच विस्कटले आहे.
पोषक हवामानामुळे दरवर्षी संक्रांत झाल्यापासून भाजीपाल्याची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर रेलचेल असते. अलीकडे तर उसाची लागण रुंद पट्ट्याने करण्याकडे कल वाढल्याने उसातच आंतरपीक म्हणून भाजीपाल्याची लागवड केली जात आहे. परिणामी एकाचवेळी माल बाजारात येत असल्याने आवक वाढून दरामध्ये घसरण झाली आहे. गेल्या १५ दिवसांपासून ही घसरण सुरू असून, या आठवड्यात तर, दराने निच्चांक गाठला आहे.
नोव्हेेंबरनंतर तुटलेल्या उसाची बिले अद्याप झाली नसल्याने हातात पैसा नाही. निदान भाजीपाल्याची विक्री करून तरी घरखर्च भागवावा म्हणून शेतकरी भाजीपाल्याचे बोचके घेऊन जवळची बाजारपेठ गाठत आहे; पण बाजारपेठेत गेल्यावर शेतकºयाच्या पदरी निराशा येत आहे. गवारी सोडली, तर आज कुठल्याही भाजीपाल्याला दर राहिलेला नाही. गवारी २0 ते २५ रुपये पावशेर आहे. ओरडून ओरडून विकले, तरी शेवटी वाहतूकखर्चही निघत नसल्याचे चित्र आहे.
औषधांचा खर्च निघेना
दाट धुके, ढगाळ वातावरणासह सततच्या बदलणाºया तापमानामुळे भाजीपाला जगवण्याची कसरत शेतकºयांना करावी लागत आहे. बुरशी, पाने खाणाºया अळ्यांचे प्रमाण वाढले आहे. बुरशीनाशकाची १00 मिलीलिटरची किंमत १५0 रुपये आहे. १00 मिलित चार पंप होतात. एक पंप फवारणीसाठी ५0 रुपये मजुरी द्यावी लागते. टॉनिकसह इतर फवारण्या, बियाणे, खते व मजुरीचा खर्च यात धरला, तर भाजीपाल्याची लागवड न केलेलीच बरी, असे शेतकºयांचे म्हणणे आहे.
मेथी, कोथिंबीर
१00 रुपये शेकडा
किरकोळ बाजारात अक्षरश: कचरा झाला असताना, घाऊक बाजारात तर विचारायचीच परिस्थिती राहिलेली नाही. कोथिंबीर, मेथी, १00 ते २00 रुपये शेकडा पेंढी असा भाव आहे. कोबी, वांग्यांना १0 किलोचा दर ५0 ते ७५ रुपये इतका आहे.

Web Title: Vectuo of Ghettu; Kawidimolane Vegetable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.