वीरशैव समाज हा हिंदू धर्माचाच भाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:22 AM2021-02-07T04:22:47+5:302021-02-07T04:22:47+5:30
कोल्हापूर : हिंदू हा धर्म आहे तर वीरशैव लिंगायत ही आचरण पद्धती आहे. त्यामुळे आपला समाज हा हिंदू ...
कोल्हापूर : हिंदू हा धर्म आहे तर वीरशैव लिंगायत ही आचरण पद्धती आहे. त्यामुळे आपला समाज हा हिंदू धर्माचाच भाग आहे. त्याला वेगळे काढता येणार नाही. राजकीय हेतूने प्रेरित काही जण याबाबत दिशाभूल करत आहेत. त्याला बळी न पडता जनगणनेवेळी आपला धर्म हिंदू असल्याचेच नमूद करा, असे आवाहन अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे प्रवक्ते डॉ. विजय जंगम स्वामी यांनी शनिवारी येथे केले.
येथील अक्कमहादेवी मंटप येथे आयोजित महासंघाच्या जनजागृती मेळावा आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य गौडगावकर, डॉ. नीलकंठ शिवाचार्य धारेश्वरकर, डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मन्मथधमकर, ज्ञानभास्कर महादेव शिवाचार्य महाराज वाई, वेदांताचार्य दिंगबर शिवाचार्य महाराज वसमत, डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य मुखेडकर, गुरू सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज सुरगीश्वर मठ नूल उपस्थित होतेे.
या कार्यक्रमामध्ये शरद गंजीकर पुणे, वीरशैव संत साहित्याच्या अभ्यासक शामाताई घोणसे, कोल्हापूर वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे, सिद्धाराम पाटील सोलापूर, रामदास पाटील, मनोहर भोळे, किशोर बाळासाहेब पाटील, परमेश्वर लांडगे, डॉ. महेश रेवाडकर, संतोष स्वामी, कोल्हापुरातील वीरशैव अर्बन मल्टिपर्पज निधी बँकेचे अध्यक्ष संतोष जंगम, बाळकृष्ण सांगवडेकर, सागर माळी यांना गौरवण्यात आले.
यावेळी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, इचलकरंजीच्या नगरध्यक्षा अलका स्वामी, वीरशैव बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापुरे, संचालक चंद्रकांत स्वामी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भिवलिंग जंगम, अजित जंगम, वैजनाथ स्वामी, विद्या जंगम, प्रकाश जंगम, प्रदेशाध्यक्ष नंदूशेठ जंगम उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संतोष जंगम, अनिल भुसके, लक्ष्मीकांत वडगावकर, किशोर पाटील, सतीश दिवटे, चिराग गाताडे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी संयोजन केले होते. मीनल जंगम आणि अजित जंगम यांनी सूत्रसंचालन केले.
०६०२२०२१ कोल लिंगायत महासंघ
अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या शनिवारी कोल्हापूर येथे झालेल्या जनजागृती मेळाव्यामध्ये राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. विजय जंगम स्वामी यांनी मार्गर्दशन केले. यावेळी डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य गौडगावकर, डॉ. नीलकंठ शिवाचार्य धारेश्वरकर, डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मन्मथधमकर, ज्ञानभास्कर महादेव शिवाचार्य महाराज वाई, वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज वसमत, डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य मुखेडकर, गुरू सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज सुरगीश्वर मठ नूल, अशोक स्वामी आदी उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)