व्यापाऱ्यांनीच घेतला निर्णय : बाजार समितीत आज भाजीपाला सौदे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 12:32 PM2020-04-14T12:32:40+5:302020-04-14T12:34:00+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत आज, मंगळवारी भाजीपाल्याचे सौदे बंद करण्याचा निर्णय व्यापाºयांनीच घेतला आहे. सौद्याच्या वेळी ...

 Vegetable deals closed today in Market Committee | व्यापाऱ्यांनीच घेतला निर्णय : बाजार समितीत आज भाजीपाला सौदे बंद

व्यापाऱ्यांनीच घेतला निर्णय : बाजार समितीत आज भाजीपाला सौदे बंद

Next
ठळक मुद्दे बॅरेकेटस्मधूनच सौदे काढण्यासाठी समिती आग्रहीबॅरेकेटस्मधूनच सौदे काढण्यासाठी समिती आग्रही

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत आज, मंगळवारी भाजीपाल्याचे सौदे बंद करण्याचा निर्णय व्यापाºयांनीच घेतला आहे. सौद्याच्या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने पोलीस प्रशासनाने कारवाईचा इशारा दिला होता. त्यानुसार सौद्याच्या ठिकाणी बॅरेकेटस् लावण्याचे काम सुरू असून, ते पूर्ण झाले तरच उद्या, बुधवारपासून भाजीपाला मार्केट सुरू होणार आहे.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांत सर्वाधिक गर्दीही भाजीपाला खरेदीसाठीच होत आहे. लक्ष्मीपुरी येथील किरकोळ बाजार असो अथवा कोल्हापूर बाजार समिती घाऊक बाजार, येथे मोठी गर्दी होते. भाजीपाला सौद्याच्या वेळी तर सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश: फज्जा उडत होता. त्यावर महापालिका व पोलीस प्रशासनाने हरकत घेत, योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन केले होते. तरीही व्यापारी व शेतकºयांकडून त्याचे पालन होत नसल्याने रविवारी मार्केट बंद करण्याचा इशारा दिला होता.

सोमवारी सकाळी सौदे निघाल्यानंतर बाजार समितीच्या वतीने सौद्याच्या ठिकाणी बॅरेकेटस् लावण्यास सुरुवात केली. मात्र, मंगळवारी सौदे काढणार नसल्याने माल आणू नये, असे व्यापाºयांनी शेतकºयांना कळविले आहे.

बॅरेकेटस्मधून सौदा कसा काढायचा?
समिती प्रशासनाने जरी बॅरेकेटस्ची व्यवस्था केली असली तरी यातून सौदा कसा काढायचा? असा प्रश्न काही व्यापारी विचारत आहेत. त्यापेक्षा सौदेच बंद ठेवावेत, असाही एक मतप्रवाह व्यापाºयांमधून पुढे आला आहे.

 

 

सध्या, समितीत ४० टक्केच भाजीपाल्याची आवक सुरू आहे. त्यात सोशल डिस्टन्सिंग ठेवून भाजीपाल्याचे सौदे काढणे कठीण असल्याचे व्यापाºयांचे मत आहे. तरीही आमचा बुधवारी सौदे सुरू करण्याचा प्रयत्न असून नाही झाले, तर शनिवारपासून नियमित होईल.
- सलीम बागवान (अध्यक्ष, भाजीपाला व्यापारी असोसिएशन)
 

 

Web Title:  Vegetable deals closed today in Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.