व्हाईट आर्मीच्या अन्नछत्रास भाजी विक्रेत्यांचा हातभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 05:59 PM2020-06-24T17:59:31+5:302020-06-24T18:51:43+5:30
कोरोनामुळे लागू केलेल्या संचारबंदीच्या काळात आणि संचारबंदी शिथिल केलेल्या काळातही अनेकांची जेवणाची व्यवस्था व्हाईट आर्मी या स्वयंसेवी संस्थेने भागविली. आतापर्यंत साडेपाच लाख लोकांनी या अन्नछत्राचा लाभ घेतला. या अन्नछत्राची वाटचाल आता १०० दिवसांकडे सुरू असून यासाठी अनेकांचा हातभार लागला आहे. त्यात मार्केट यार्डातील भाजी विक्रेते आणि दलालांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.
कोल्हापूर : कोरोनामुळे लागू केलेल्या संचारबंदीच्या काळात आणि संचारबंदी शिथिल केलेल्या काळातही अनेकांची जेवणाची व्यवस्था व्हाईट आर्मी या स्वयंसेवी संस्थेने भागविली. आतापर्यंत साडेपाच लाख लोकांनी या अन्नछत्राचा लाभ घेतला. या अन्नछत्राची वाटचाल आता १०० दिवसांकडे सुरू असून यासाठी अनेकांचा हातभार लागला आहे. त्यात मार्केट यार्डातील भाजी विक्रेते आणि दलालांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.
कांदा, बटाटा, वांगी, फ्लॉवर, कोबी, मेथी, दोडका, मिरची, शेवग्याच्या शेंगा, काकड्या अशा प्रकारच्या अनेकविध भाज्या या अन्नछत्रासाठी मार्केट यार्ड येथील सर्व भाजी विक्रेते आणि दलाल रोज विनामूल्य पुरवितात.
मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर, जहांगीर पन्हाळकर, अमजद फरास, अल्लाहबूर बागवान, बाबूराव कांदेकर(लाड), ईर्शाद बागवान, जावेद अल्लीभाई बागवान, जमीर महंमद बागवान, कलंदर बादशाह बागवान, विक्रम विश्वास पाटील, इम्तियाज बागवान, नासीर कराडकर, हसरत बागवान, नितीन कुरणे, राकेश जाधव, साहल अफ्रीभाई बागवान, किरण आर्दाळकर या भाजी विक्रेत्यांचा यात समावेश आहे.
सध्या कोल्हापूर रेल्वे स्थानकाजवळ आणि तावडे हॉटेलजवळील लोक नियमितपणे या अन्नछत्राचा लाभ घेत आहेत. ८९ व्या दिवसापर्यंत म्हणजे मंगळपर्यंत ५,४७,०२ लोकांनी या अन्नछत्राचा लाभ घेतला आहे. व्हाईट आर्मीचे सुमारे १०० महिला आणि पुरुष जवान दिवसरात्र या अन्नछत्रासाठी राबत आहेत.
व्हाईट आर्मी गेली काही वर्षे सैन्यभरतीदरम्यान, पूरपरिस्थितीदरम्यान वेळोवेळी अन्नछत्र उभारते. विशेष म्हणजे या काळात एकही दिवस कुणी भाजी देण्यास कुचराई केलेली नाही. उलट आपणहून फोन करून भाजी नेण्याची विनंती केली जाते. त्यावेळीही मार्केट यार्ड येथील हे भाजी विक्रेते, अडत दुकानदार आणि दलाल संस्थेला मदत करतात.
- अशोक रोकडे,
अध्यक्ष, व्हाईट आर्मी