रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आहारात रानभाजीच आवश्यक : डाॅ बाचुळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:30 AM2021-08-17T04:30:19+5:302021-08-17T04:30:19+5:30

तारळे खुर्द (ता. राधानगरी) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत रानभाजी महोत्सवाचे ...

Vegetables are essential in the diet to boost the immune system: Dr. Bachulkar | रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आहारात रानभाजीच आवश्यक : डाॅ बाचुळकर

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आहारात रानभाजीच आवश्यक : डाॅ बाचुळकर

Next

तारळे खुर्द (ता. राधानगरी) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डाॅ. बाचूळकर यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आबिटकर होते. यावेळी शेतकऱ्यांनी रानभाज्यांचे उत्पादन वाढविले तर त्याचे मार्केटिंग करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करणे गरजेचे आहे. राधानगरीच्या जैवविविधतेला देशामध्ये वेगळी ओळख असून आपण सर्वांनी चायनीजची दुकाने बंद करून रानभाज्यांच्या मार्केटिंगसाठी प्रयत्न करावेत, असे आम. आबिटकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून म्हणाले.

या रानभाजी मोहत्सवामध्ये तालुक्यातील महिला बचतगट आणि शेतकरी महिलांनी पन्नासहून अधिक रानभाज्याचे पदार्थ आणि रानभाज्याचे प्रदर्शन मांडले होते. यावेळी वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांनी प्रत्येक जैवविविधतेची माहिती देत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रानभाज्यांचे अधिक महत्त्व असल्याचे सांगितले. निलगिरी व अष्टमबाभुळ या परदेशी वृक्षापेक्षा देशी वृक्ष जगले पाहिजेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे शेवटी डाॅ. बाचूळकर यांनी आवाहन केले.

यावेळी पंचायत समिती सभापती सोनाली पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

Web Title: Vegetables are essential in the diet to boost the immune system: Dr. Bachulkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.