कोल्हापुरात वाढदिवसावेळीच वाहनांची मोडतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:37 AM2021-02-23T04:37:50+5:302021-02-23T04:37:50+5:30

------------------------------------------------- बांधकाम सभापतीसह चाैघांना जतमध्ये अटक जत (जि. सांगली) : जत शहरातील दोन गटांत किरकोळ कारणावरून काठी व दगडाने ...

Vehicle breakdown in Kolhapur on his birthday | कोल्हापुरात वाढदिवसावेळीच वाहनांची मोडतोड

कोल्हापुरात वाढदिवसावेळीच वाहनांची मोडतोड

Next

-------------------------------------------------

बांधकाम सभापतीसह चाैघांना जतमध्ये अटक

जत (जि. सांगली) : जत शहरातील दोन गटांत किरकोळ कारणावरून काठी व दगडाने मारामारी झाली. या प्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी दाखल असून, बारा जणांच्या विरोधात जत पोलिसांत गुन्हा दाखल आहे. यात जत नगर परिषदेच्या बांधकाम सभापतीसह चाैघांना अटक झाली आहे.

-------------------------------------------------

कुंडल येथे २३ मार्चला शेतकरी परिषद

सांगली : केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात पाच जिल्ह्यांची शेतकरी परिषद कुंडल येथे २३ मार्चला घेण्यात येणार आहे. सांगलीत संयुक्त शेतकरी, कामगार मोर्चाच्या बैठकीत तसा निर्णय झाला. आमदार अरुण लाड व पुरोगामी विचारवंत डॉ. बाबूराव गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी कार्यकर्त्यांची बैठक झाली.

-------------------------------------------------

पत्र्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू

शिरवळ (जि. सातारा) : शिरवळ येथील जुन्या औद्योगिक वसाहतीत साफसफाई करत असताना पारदर्शक पत्रा तुटून ३५ ते ४० फूट खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. राहुल पोपट कुंभार (वय ३०, रा. किन्हई, ता. कोरेगाव) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

-------------------------------------------------

खेडमध्ये ग्रामस्थांनी बांधले २१७ बंधारे

खेड (जि. रत्नागिरी) : जिल्हा परिषद कृषी विभागाकडून गावागावात लोकसहभागातून बंधारे उभारण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या वर्षी लांबलेल्या पावसामुळे डिसेंबर महिन्यात या कामाला सुरुवात झाली. आतापर्यंत तालुक्यात सुमारे २१७ बंधारे उभारण्यात आले असून, भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

-------------------------------------------------

चिपळूण, संगमेश्वरमध्ये ५४ कोटींची तीन धरणे

चिपळूण (जि. रत्नागिरी) : चिपळूण, संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील तळसर, मुंढे तर्फ सावर्डे आणि वांझोळे या तीन गावांत धरणाबरोबरच पाणी साठवण्याचे दोन तलाव मंजूर झाले आहेत. त्यावर तब्बल ५४ कोटी रुपये खर्ची पडणार असून, त्याबाबतच्या तिन्ही तलावांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत.

कोरोना महामारीत निधीची कमतरता जाणवत असतानाच आमदार शेखर निकम यांच्या आग्रही मागणीला उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

-------------------------------------------------

काजू बागेला शॉर्टसर्किटने आग

बांदा (जि. सिंधुदुर्ग): मडुरा हायस्कूलजवळ असलेल्या प्रकाश वालावलकर यांच्या काजू बागायतीला अचानक शॉर्टसर्किटने आग लागली. रौद्ररूप धारण करण्याच्या अगोदरच ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने तत्काळ आग आटोक्यात आणण्यात आली. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठे नुकसान टळले. ही आग शॉर्टसर्किटमुळेच लागल्याचे बागायतदार प्रकाश वालावलकर यांनी सांगितले.

-------------------------------------------------

अवकाळी पावसामुळे नगदी पिके धोक्यात

बांदा (जि. सिंधुदुर्ग) : अवकाळी पावसामुळे बांदा दशक्रोशीतील मिरची, चवळी, भुईमूग, मका, नाचणी आदी नगदी पिके धोक्यात आल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. शुक्रवारी दुपारी झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे दशक्रोशीत नगदी पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: Vehicle breakdown in Kolhapur on his birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.