ऊसतोड मजुरांकडून वाहनधारक वेठीस

By admin | Published: September 18, 2014 11:20 PM2014-09-18T23:20:25+5:302014-09-18T23:25:33+5:30

उचलीसाठी लाखो रुपये : कायदेशीर मार्ग काढण्याची गरज

Vehicle holders from unloaded laborers | ऊसतोड मजुरांकडून वाहनधारक वेठीस

ऊसतोड मजुरांकडून वाहनधारक वेठीस

Next

बालेचाँद हेरवाडे = पट्टणकोडोली -साखर कारखाने सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी ऊसतोड मजुरांना दिलेल्या रकमेची परतफेड झालेली नसताना, चालू वर्षीच्या गळीत हंगामासाठी बेभरवशाच्या ऊसतोड मजुरांच्या टोळ्यांना उचल म्हणून पुन्हा लाखो रुपये द्यावे लागत आहेत. त्यामुळे वाहनधारकांना आर्थिक संकटाला सामारे जावे लागत आहे. अशीच मागील वर्षीची ऊसतोड मजुरांकडून परतफेड न झालेली रक्कम मागण्यासाठी जाणाऱ्या वाहनधारकांना मारहाण करण्याचे प्रकार टोळीकडून होत आहेत.
पट्टणकोडोली परिसरात ऊस वाहतूक धारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वाहतूकदार पंचगंगा, शरद, दत्त, राजाराम, वारणा, शाहू, आणि जवाहर साखर कारखाना, आदी कारखान्यांसाठी ऊस वाहतुकीचे काम करतात. ऊसतोडणीसाठी मजूर म्हणून विजापूर, बीड, नगर, जत, अथणी, सांगोला, परभणी, आदी भागांतून मजुरांच्या टोळ्या ठरवितात.
ऊसतोड मजुरांच्या टोळ्यांना वाहतूकदारांकडून लाखो रुपये उचल म्हणून दिले जातात. मागील वर्षीच्या टोळ्यांना दिलेली रकमेची हंगामात परतफेड न झाल्याने चालू वर्षी पुन्हा टोळीसाठी उचल देण्यासाठी रक्कम जमवाजमव करताना वाहतूकदारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक वर्षी टोळ्यांकडून फसवणूक होऊनही वाहतूकदार मजुरांना पैसे देत आहेत. चालू हंगाम सुरू होण्यापूर्वी काही वाहतूकदारांनी ऊसतोड मजुरांच्या भागात जाऊन रक्कम परत मागण्याचा प्रयत्न केला असता, तेथील स्थानिक लोक व ऊसतोड मजूर यांच्याकडून त्यांना मारहाणीचे प्रकार घडत आहेत.

Web Title: Vehicle holders from unloaded laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.