‘वाहन निरीक्षक’ पूर्व परीक्षेचा वाढदिवस करून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:21 AM2021-03-19T04:21:31+5:302021-03-19T04:21:31+5:30
एमपीएससीने २४० सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या भरतीची जाहिरात दि. १७ जानेवारी २०२० रोजी प्रसिद्ध केली. या पदाच्या ...
एमपीएससीने २४० सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या भरतीची जाहिरात दि. १७ जानेवारी २०२० रोजी प्रसिद्ध केली. या पदाच्या परीक्षेसाठी ९८ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. वेळापत्रकानुसार दि. १५ मार्च २०२० रोजी परीक्षा झाली. मात्र, वर्ष झाले तरी या परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही. या परीक्षार्थींना अभ्यासाची पुढील दिशा ठरविणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे या परीक्षेचा निकाल लवकर जाहीर करावा, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना परीक्षार्थींनी छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून दिले. यावेळी परीक्षार्थी अमित इंगवले, स्वप्निल बराले, राकेश कोळी, दिगंबर माने, सोपान पाटील, संग्राम खोत, आकाश पाटील, नीलेश साठे, योगेश गलगले, उमेद मोटे, मनोज ढेबे, प्रसाद हजारे, ओंकार हजारे, शुभम माने, योगेश कांबळे, इंद्रजित मोरे उपस्थित होते.
फोटो (१८०३२०२१-कोल-परीक्षार्थी आंदोलन) : कोल्हापुरात सोमवारी वर्ष झाले तरी निकाल लागत नसल्याने परीक्षार्थींनी सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाचा पूर्व परीक्षेचा वाढदिवस साजरा करून निषेध नोंदविला.