कोल्हापुरात रात्री अकरानंतरही वाहने रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 12:03 PM2020-12-25T12:03:43+5:302020-12-25T12:05:03+5:30
CoronaVirus Kolhapur- रात्री अकरापासून सकाळी सहापर्यंत संचारबंदी लागू केली असली तरी कोल्हापुरात मात्र याची सोयीने अंमलबजावणी सुरू असल्याचे चित्र आहे. चौकाचौकांत पोलीस आहेत पण त्यांच्यासमोरूनच वाहनांची ये-जा सुरू आहे.
कोल्हापूर : रात्री अकरापासून सकाळी सहापर्यंत संचारबंदी लागू केली असली तरी कोल्हापुरात मात्र याची सोयीने अंमलबजावणी सुरू असल्याचे चित्र आहे. चौकाचौकांत पोलीस आहेत पण त्यांच्यासमोरूनच वाहनांची ये-जा सुरू आहे.
दोन दिवसांपूर्वीपासून रात्री अकरा ते सकाळी सहा या वेळेत महानगरपालिका क्षेत्रात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे; परंतु गेल्या काही महिन्यांत रात्री बारा, साडेबारापर्यंत वाहतुकीची पडलेली नागरिकांची सवय अजून मोडेनाशी झाली आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास शहरात फेरफटका मारला असताना वाहने सुसाटपणे रस्त्यावरून ये-जा करत होती.
दसरा चौकात पोलीस व्हॅन लावून पोलीस उभे होते; परंतु वाहनधारकांना फारसे विचारले जात नव्हते. गंगावेश चौक, बिंदू चौक या ठिकाणीही हीच परिस्थिती होती. केवळ महाराणा प्रताप चौकामध्ये मात्र वाहनचालकांना पोलीस हटकत होते.