शहरात विशेष मोहिमेस अत्यल्प प्रतिसाद, दिवसात ३०८७ जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:29 AM2021-09-24T04:29:47+5:302021-09-24T04:29:47+5:30
कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून गुरुवारी कोविशिल्डचे ३०८७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये १८ ते ४५ वर्षांपर्यंत ...
कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून गुरुवारी कोविशिल्डचे ३०८७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये १८ ते ४५ वर्षांपर्यंत २३४४, तर ४५ ते ६० वर्षांपर्यंत ५१३ नागरिकांचा व ६० वर्षांवरील २०७ नागरिकांचा समावेश आहे. विशेष लसीकरण मोहिमेस नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे.
तसेच १८ वर्षांवरील विशेष लसीकरण मोहिमेअंतर्गत गुरुवारी केवळ ५४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये पाच नागरिकांना पहिला डोस, तर ४९ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. केंद्रावर नोंदणी करून तात्काळ लस देण्याच्या मोहिमेस नागरिकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे.
शहरात आजअखेर तीन लाख ७३ हजार ७४९ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले. यामध्ये पहिला डोस दोन लाख ४९ हजार ८१९ व दुसरा डोस एक लाख २३ हजार ९३० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
आज, शुक्रवारी १८ वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्डचा डोस देण्यात येणार आहे. यावेळी प्रत्येक केंद्रावर ५०० नगरिकांना कुपन देऊन ऑन दि स्पॉट रजिस्ट्रेशन करून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच भगवान महावीर रुग्णालय व द्वारकानाथ कपूर रुग्णालय येथे लसीकरण करण्यात येणार आहे.