अतिदुर्मिळ पाणमांजराचे कोकणात दर्शन

By admin | Published: May 2, 2017 06:22 PM2017-05-02T18:22:41+5:302017-05-02T18:25:38+5:30

रत्नागिरीच्या कशेळी बांधावर वास्तव्य

Very rarely seen in Konkan in Konaman | अतिदुर्मिळ पाणमांजराचे कोकणात दर्शन

अतिदुर्मिळ पाणमांजराचे कोकणात दर्शन

Next

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. 0२ : रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी बांध येथील खाडीत पाणमांजर•या अतिदुर्मिळ सस्तन प्राण्याचे रविवारी दर्शन झाले. महाराष्ट्र व गोवा राज्यातील पश्चिम घाटात केवळ २ ते ३ प्राण्यांची यापूर्वी नोंद झाली आहे.

तळे, नाले, मोठे तलाव व कालव्याच्या आसपास राहणारे, पाण्याचा स्त्रोत कमी झाल्यास जमिनीवरसुध्दा वास्तव्य, जंगलाच्या डोंगराळ भागातील बिळात लपून बसणारे हे प्राणी•अन्न व पाण्याच्या शोधात खूप दूरवर जातात.

मांसभक्षक, कळपाने राहून मासेमारी करणारे अशी त्यांची ओळख आहे. लहान नखे असलेल्या या प्राण्यांच्या•शरीराची सरासरी लांबी- ७० सें.मी असून •शेपटीची सरासरी लांबी ४२.५ सें.मी आहे. सरासरी ९ कि.ग्रॅ. वजन असणाऱ्या या पाणमांजराची कातडी तुकतुकीत आणि काळसर तपकिरी रंगांची आहे. खेकडे व मासे हे त्यांचे प्रमुख भक्ष्य आहे.•उत्तेजित झाल्यास शीळ देतात. खाडीत डुंबणाऱ्या पाणमांजरांचे छायाचित्र टिपले आहे, आदित्य वेल्हाळ यांनी.

Web Title: Very rarely seen in Konkan in Konaman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.