‘व्होटर हेल्पलाईन’द्वारे घरबसल्या समजणार फेरीनिहाय कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 01:01 AM2019-05-13T01:01:55+5:302019-05-13T01:02:00+5:30

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतरचा कल फेरीनिहाय नागरिकांना घरबसल्या समजणार आहे. भारत निवडणूक आयोगाने ‘व्होटर हेल्पलाईन’ हे अ‍ॅप विकसित ...

Vibrant helpline | ‘व्होटर हेल्पलाईन’द्वारे घरबसल्या समजणार फेरीनिहाय कल

‘व्होटर हेल्पलाईन’द्वारे घरबसल्या समजणार फेरीनिहाय कल

googlenewsNext

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतरचा कल फेरीनिहाय नागरिकांना घरबसल्या समजणार आहे. भारत निवडणूक आयोगाने ‘व्होटर हेल्पलाईन’ हे अ‍ॅप विकसित केले असून, त्याचा यंदा प्रथमच वापर होत आहे. अधिकाऱ्यांसाठीही
‘न्यू सुविधा’ हे अ‍ॅप विकसित केले असून, त्याबाबत शनिवारी (दि. ११) सर्व निवडणूक निर्णय अधिकारी,
तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना ‘व्हिसी’द्वारे आयोगाच्या अधिकाºयांकडून प्रशिक्षण देण्यात आले.
निवडणुकीच्या निकालाची माहिती नागरिकांना घरबसल्या बिनचूक मिळावी, यासाठी निवडणूक आयोगाने यावर्षी ‘व्होटर हेल्पलाईन’ हे अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपद्वारे मतमोजणीनंतर फेरीनिहाय निकालाची माहिती समजणार आहे.
यासंदर्भात शनिवारी जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि सर्व विधानसभा मतदारसंघांचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांना
भारत निवडणूक आयोगाच्या अधिकाºयांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रशिक्षण दिले. यामध्ये मतमोजणीची डाटा एंट्री कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
मतमोजणीवेळी निवडणुकीत झालेल्या मतदानाची डाटा एंट्री सुरुवातीला थेट अधिकाºयांसाठी विकसित करण्यात आलेल्या ‘न्यू सुविधा’ अ‍ॅपमध्ये करायची
आहे. मतमोजणी केंद्रातूनच ही
माहिती सहायक निवडणूक अधिकारी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर पाठवतील. तेथून ही माहिती नागरिकांसाठी विकसित केलेल्या ‘व्होटर हेल्पलाईन’ या अ‍ॅपवर पाठविली जाईल. त्यामुळे नागरिकांना घरबसल्याच फेरीनिहाय कल समजणार आहे.

Web Title: Vibrant helpline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.