प्र-कुलगुरूंनी कुटुंबीयांसमवेत स्वीकारला कार्यभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:39 AM2020-12-12T04:39:41+5:302020-12-12T04:39:41+5:30
कोल्हापूर : डॉ. पी. एस. पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाचे सातवे प्र-कुलगुरू म्हणून शुक्रवारी कुटुंबीयांसमवेत सूत्रे स्वीकारली. पदभार घेतल्यानंतर ...
कोल्हापूर : डॉ. पी. एस. पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाचे सातवे प्र-कुलगुरू म्हणून शुक्रवारी कुटुंबीयांसमवेत सूत्रे स्वीकारली. पदभार घेतल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, पहिले कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार, बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्यांना अभिवादन केले.
पाटील यांची गुरुवारी (दि. १०) प्र-कुलगुरुपदी निवड जाहीर झाली. शुक्रवारी सकाळी त्यांनी पत्नी शिल्पा पाटील आणि मुलगा अखिलेश व आर्यन यांच्यासमवेत मुख्य प्रशासकीय इमारतीत प्रवेश केला. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी डॉ. पाटील यांचे दालनात स्वागत केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी ग्रंथभेट देऊन त्यांचे स्वागत केले. डॉ. पाटील हे विद्यार्थिप्रिय शिक्षक असल्याने याप्रसंगी त्यांचे पदार्थविज्ञान व नॅनो सायन्स व तंत्रज्ञान अधिविभागातील विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते.
चौकट ०१
असाही योगायोग
प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील हे शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पवार यांचे जावई. विद्यापीठ प्रांगणातील कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा हा डॉ. पवार यांच्या कारकिर्दीत सन १९८८ मध्ये उभारण्यात आला. कर्मवीरांच्या पुतळ्याला अभिवादन करताना डॉ. पवार यांच्या आठवणीने डॉ. पाटील गहिवरले. सासऱ्यांच्या कारकिर्दीत साकारलेल्या पुतळ्यास अभिवादन करून जावयाने आपल्या कारकिर्दीचा प्रारंभ करण्याचा योग यावेळी जुळून आला.
फोटो: १११२२०२०-कोल-विद्यापीठ ०१
फाेटो ओळ : शिवाजी विद्यापीठाचे सातवे प्र-कुलगुरू म्हणून डॉ. पी. एस. पाटील यांनी शुक्रवारी कुटुंबीयांसमवेत सूत्रे स्वीकारली.