शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी पी. एस. पाटील  : पदभार स्वीकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 03:22 PM2020-12-11T15:22:29+5:302020-12-11T15:25:05+5:30

Shivaji University, EducationSector, Kolhapurnews शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी प्रा. डॉ. प्रमोद शंकरराव तथा पी. एस. पाटील यांची नियुक्ती झाली. ते सध्या विद्यापीठातील पदार्थविज्ञान अधिविभागाच्या प्रमुखपदी कार्यरत आहेत. त्यांच्या प्र-कुलगुरूपदावरील नियुक्तीचा ई-मेल सायंकाळी पाच वाजता कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यालयाकडून विद्यापीठ प्रशासनाला मिळाला.

As the Vice-Chancellor of Shivaji University, P. S. Patil: Accepted the post | शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी पी. एस. पाटील  : पदभार स्वीकारला

शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी पी. एस. पाटील  : पदभार स्वीकारला

googlenewsNext
ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी पी. एस. पाटील  कुलपतींकडून नियुक्ती : पदभार स्वीकारला

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी प्रा. डॉ. प्रमोद शंकरराव तथा पी. एस. पाटील यांची नियुक्ती झाली. ते सध्या विद्यापीठातील पदार्थविज्ञान अधिविभागाच्या प्रमुखपदी कार्यरत आहेत. त्यांच्या प्र-कुलगुरूपदावरील नियुक्तीचा ई-मेल सायंकाळी पाच वाजता कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यालयाकडून विद्यापीठ प्रशासनाला मिळाला.

विद्यापीठाचे विद्यार्थी असलेल्या डॉ. पाटील यांनी सातवे प्र-कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला. या पदावरील नियुक्तीसाठी आठजण इच्छुक होते. त्यातील तीनजणांची नावे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी गेल्या महिन्यात कुलपतींना पाठविली होती. त्यानंतर गुरुवारी या पदावर डॉ. पाटील यांची नियुक्ती झाल्याची माहिती कुलपती कार्यालयाकडून विद्यापीठाला कळविण्यात आली.

डॉ. पाटील यांचे मूळ गाव दुंडगे (ता.चंदगड) आहे. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण सांगली येथे झाले. विलिंग्डन महाविद्यालयातून त्यांनी पदार्थविज्ञान विषयात बी.एस्सी. केली. त्यानंतर विद्यापीठातून त्यांनी एम.एस्सी. आणि पीएच.डी. पूर्ण केली. त्यांना अध्यापन, संशोधनाचा ३० वर्षांचा अनुभव आहे.

विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांवर त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली आहे. त्यांनी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून काम केले आहे. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या कार्यकाळाइतका डॉ. पाटील यांचा प्र-कुलगुरूपदाचा कार्यकाळ असणार आहे.


शिवाजी विद्यापीठात गेली ३० वर्षे मी कार्यरत आहे. संशोधनात विद्यापीठाला गती मिळवून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. त्यात यशस्वी झालो. गेली पाच वर्षे अधिष्ठातापदी काम केल्याने मला प्रशासनाचा अनुभव आहे. प्र-कुलगुरूपदाच्या माध्यमातून विद्यापीठात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण अध्ययन, अध्यापन प्रणाली आणि विशेषतः संशोधन विकासावर भर देण्याचा माझा प्रयत्न राहील.
-डॉ. पी. एस. पाटील

 

 

Web Title: As the Vice-Chancellor of Shivaji University, P. S. Patil: Accepted the post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.