उपराष्ट्रपतींच्या पत्नीने घेतले अंबाबाईचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:44 AM2018-06-25T00:44:14+5:302018-06-25T00:44:19+5:30
कोल्हापूर : भारताचे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या पत्नी उषा मुप्पावरप्पू व मुलगी दीपा इम्माणी यांनी रविवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने अध्यक्ष महेश जाधव यांनी देवीची प्रतिमा व साडी देऊन त्यांचा सत्कार केला.
रविवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान त्यांचा ताफा भवानी मंडपात आला. शनिमंदिरमार्गे त्या मंदिरात गेल्या. देवीचे दर्शन घेतले. त्यांनी आणलेली साडी देवीला नेसविण्यात आली. त्यानंतर देवस्थान समितीच्या वतीने व श्रीपूजक मंडळाच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर त्या मातृलिंग दर्शनासाठी गेल्या. तिथे संकल्प सोडल्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा मारून विद्यापीठ गेटमार्गे त्या परत गेल्या. त्यांच्यासोबत मुलगी दीपा इम्माणी, प्रमिला आनंदन, चंद्राकुमारी जी, प्रमिला राजू, कविता सिद्दा रेड्डी, श्रीमती नीरजा उपस्थित होत्या.