हातकणंगलेमुळेच ‘सत्तारूढ’चा विजय

By admin | Published: April 23, 2015 12:50 AM2015-04-23T00:50:15+5:302015-04-23T00:54:13+5:30

राजाराम कारखाना : भेंडवडे, सावर्डे, नरंदे, टोप, शिरोलीत एकतर्फी मतदान

The victory of 'ruling' due to handcuffs | हातकणंगलेमुळेच ‘सत्तारूढ’चा विजय

हातकणंगलेमुळेच ‘सत्तारूढ’चा विजय

Next

आयुब मुल्ला-खोची राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्तारूढ गटाला आपली खुर्ची अबाधित ठेवण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे, सावर्डे, नरंदे, टोप, शिरोली, पेठवडगाव या गावांनीच भरघोस मदत केली. एकतर्फी मतदान करीत भेंडवडे, सावर्डे, नरंदे हेच तर आघाडीचे मानकरी ठरले. इथे थोडी जरी विरोधकांनी सावध भूमिका घेतली असती, तर मात्र चित्र वेगळे पाहावयास मिळाले असते.  कारखान्याच्या १२ हजार ६२४ सभासदांपैकी ४ हजार ८०० सभासद हातकणंगले तालुक्यातील आहेत. उर्वरित सभासद इतर सहा तालुक्यांतील आहेत. या सहा तालुक्यांतील सभासदांनी माजी मंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनेलला ७० टक्क्यांच्या आसपास मतदान केले. हातकणंगले तालुक्यातील काही गावांनी समान ठेवले, तर परिवर्तनला थोडे मताधिक्यही दिले. यामध्ये कुंभोज व कोल्हापूर, सांगली रस्त्याच्या उजव्या बाजूकडील गावांचा समावेश आहे. या गावांनी सत्तारूढ गटाला अनपेक्षितरीत्या धक्का दिला; परंतु वडगाव परिसरातील चार गावांनीच सत्तारूढची एकतर्फी सोबत केली.
विशेष म्हणजे, भेंडवडे गावातील १८० मते सत्तारूढला, तर परिवर्तनला फक्त दहा मते मिळाली. सत्तारूढचे उमेदवार सर्जेराव माने यांच्या व्यूहरचनेचा व उमेदवारीचा विक्रमी मताधिक्य घेण्यास फायदा झाला. हेच सर्जेराव माने गतवेळेला सत्तेज पाटील यांच्या पॅनेलमधून उभे होते; परंतु या परिसरारतील इतर उमेदवारांच्या तुलनेत मात्र त्यांनी थोडी कमी मते मिळाली.
सतेज पाटील यांचा स्वत:चा गट नसल्यामुळे भेंडवडे, सावर्डे, नरंदे या गावांत पॅनेलला फटका बसला. आमदार महाडिक गटाने मात्र याच गावांवर अधिक भर देत प्रचाराची सर्व यंत्रणा राबविली. या गटात महाडिक यांना मानणारा गटही प्रबळ आहे. याचा फायदा त्यांना झाला. अंतिम टप्प्यापर्यंत सतेज पाटील यांनीही प्रचारासाठी या गावात बांधणी करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना यश आले नाह

Web Title: The victory of 'ruling' due to handcuffs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.