VIDEO - ज्योतिबा डोंगरावर नगरप्रदक्षिणेला अलोट गर्दीत सुरुवात

By admin | Published: August 22, 2016 01:20 PM2016-08-22T13:20:59+5:302016-08-22T15:16:09+5:30

श्री.क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथे तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त (ता. 22) रोजी नगर प्रदक्षिणेला (दिडी) भाविकांच्या अलोट गर्दीत सुरुवात झाली.

VIDEO - The city center of Jyotiba Mountain starts in a crowded crowd | VIDEO - ज्योतिबा डोंगरावर नगरप्रदक्षिणेला अलोट गर्दीत सुरुवात

VIDEO - ज्योतिबा डोंगरावर नगरप्रदक्षिणेला अलोट गर्दीत सुरुवात

Next

ऑनलाइन लोकमत 

कोल्हापूर, दि. २२ -  श्री.क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथे तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त (ता. 22)  रोजी नगर प्रदक्षिणेला (दिडी) भाविकांच्या अलोट गर्दीत सुरुवात झाली. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ही दिंडी पूर्ण केल्यानंतर बारा ज्योतिर्लिंग व चारीधाम यात्रा पूर्ण केल्याचे पुण्य पदरी पडते अशी भाविकांची श्रद्धा आहे. 
 
सकाळी साडेआठ वाजता ज्योतिबाच्या मुख्य मंदिरातून या दिंडी सुरु झाली. त्यापूर्वी विणा पूजन होऊन डवरी मार्गस्त झाले दिंडीच्या अग्रस्थानी वीणाधारी डवरी असतात. त्यांच्या बरोबर भगवे झेंडे घेतलेले भाविक व  पुजारी होते. मंदिरात धार्मिक विधी झाल्यानंतर दिंडी मंदिराच्या दक्षिण दरवाजातून बाहेर पडली. 
 
तेथून ती गायमुख तलावाकडे येऊन. तेथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्री शैल्य समल्लिकार्जुन मंदिर व श्री मारुतीच्या मंदिरात गेली. तेथे धार्मिक विधी व आरती सोहळा होउन. जोतिबाच्या डोंगराभोवती पंधरा किलोमीटर अंतर पायी चालत भाविक ही प्रदक्षिणा पूर्ण करतात.या प्रदक्षिणेसाठी महाराष्टासह कर्नाटकमधील ‍ भाविक हजेरी लावली आहे. 
 
सायंकाळी सर्व डोंगरला वेढा घालुन यमाई मंदीर येथे पोचेल. तोपर्यंत कोणीही भाविक खाली बसत नाही. उपवास असल्याने  फराळाची सोय ठिकठिकाणी ग्रामस्थ व भाविकानी केली आहे.
 

Web Title: VIDEO - The city center of Jyotiba Mountain starts in a crowded crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.