VIDEO - कोल्हापूरचा शाही दसरा उत्साहात
By admin | Published: October 11, 2016 08:24 PM2016-10-11T20:24:51+5:302016-10-11T20:35:35+5:30
हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या कोल्हापूरवासीयांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा असा शाही दसरा सोहळा मंगळवारी संपन्न झाला.
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 11 - आपला विजयोत्सव साजरा करण्यासाठी भालदार-चोपदार..घोडेस्वार अशा शाही लव्याजम्यानिशी आलेली करवीर निवासिनी अंबाबाई, तुळजाभवानी, कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत शाहू महाराज, युवराज संभाजीराजे,
महाराजकुमार मालोजीराजे, यौवराज यांची उपस्थिती, आरतीनंतर बंदुकीच्या फैरी झाडून देवीला दिलेली सलामी, आकर्षक आतषबाजी आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या कोल्हापूरवासीयांच्या डोळ््याचे पारणे फेडणारा असा शाही
दसरा सोहळा मंगळवारी संपन्न झाला. अंबाबाई, तुळजाभवानीची ईश्वरी सत्ता आणि संस्थान सत्तेच्या संगमाने झालेल्या या शाही सीमोल्लंघन सोहळ््याला ह्यसोनं घ्या सोन्यासारखं राहाह्ण अशा शुभेच्छा देत नागरिकांनी सोने लुटले.
आठ दिवस महिषासूरशी घनघोर युद्ध करून विजय मिळवलेल्या दुर्गेच्या विजयोत्सवाचा परमोच्च क्षण म्हणजे सीमोल्लंघन सोहळा. यानिमित्त करवीर निवासिनी अंबाबाईची रथारूढ पूजा बांधण्यात आली. आपला विजयोत्सव साजरा
करण्यासाठी देवी रथात बसून जाते, असा यामागचा अन्वयार्थ आहे. कोल्हापूरचा शाही दसरा म्हणजे देशवासीयांचे आकर्षण. संस्थान खालसा झाले असले तरी येथील संस्थानकालीन परंपरा आजही सुरू आहेत, त्यातला महत्त्वाचा उत्सव
म्हणजे करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा शारदीय नवरात्रोत्सव. संध्याकाळी पाच वाजता अंबाबाईची आणि तुळजाभवानी देवीच्या पालख्या आपल्या लव्याजम्यानिशी दसरा चौकाकडे प्रस्थान झाल्या. दरम्यान, श्रीमंत शाहू महाराज, युवराज संभाजीराजे, महाराजकुमार मालोजीराजे, बाळराजे शहाजीराजे, यौवराज यशराजे यांचे मेबॅक कारमधून सोहळास्थळी आगमन झाले. सोहळास्थळी पोलीस बँडने देवीला मानवंदना दिली. शाहू महाराजांच्या हस्ते देवीची आरती झाल्यानंतर सहा वाजून बारा मिनिटांनी बंदुकीच्या फैरी झाडून या शाही सोहळ््याला सलामी देण्यात आली. त्यानंतर नागरिकांनी सोने लुटले.
छत्रपतींनी मेबॅक कारमध्ये उभे राहून कोल्हापूरकरांकडून सोने स्वीकारले. त्यानंतर जुना राजवाड्यात दसऱ्याचा दरबार भरविण्यात आला.अंबाबाईची पालखी आपल्या लव्याजम्यानिशी सिद्धार्थनगर, पंचगंगा नदी घाट, पापाची तिकटी, गुजरीमार्गे रात्री मंदिरात परतली. रात्री पालखी सोहळा संपन्न झाला.
>