शाहूंच्या जिल्ह्यात ‘विद्यामंदिर हरिजनवाडा’

By admin | Published: March 3, 2015 12:42 AM2015-03-03T00:42:08+5:302015-03-03T00:43:21+5:30

शाहूवाडी तालुक्यातील शाळा : नावांतूनच जातीचे बीजारोहण

'Vidyamandir Harijanwada' in Shahu district | शाहूंच्या जिल्ह्यात ‘विद्यामंदिर हरिजनवाडा’

शाहूंच्या जिल्ह्यात ‘विद्यामंदिर हरिजनवाडा’

Next

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा असलेल्या जिल्ह्णातील शित्तूर वारुण (ता. शाहूवाडी) येथे ‘विद्यामंदिर हरिजनवाडा’ या नावाने शाळा आहे. ‘हरिजनवाडा’ नाव असल्यामुळे सवर्णाच्या बहुतांशी मुलांनी या शाळेकडे पाठ फिरविली आहे. शिक्षणाचे धडे गिरविण्यास सुरुवात करण्यापूर्वीच नावामुळे विशिष्ट असा समाज, जातीचे बीज विद्यार्थ्यांच्या बालमनात अप्रत्यक्षपणे रूजत आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात जात आडवी येऊ नये म्हणून अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. नावातूनच जात, समाज निदर्शनास येत असतानाही तालुका, जिल्हा पातळीवरील शिक्षण प्रशासनाने आजपर्यंत डोळेझाक केल्याचे दिसत आहे. पुरोगामी महाराष्ट्राला जाती-पातीच्या अंताच्या संघर्षाचा इतिहास आहे. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा आहे. शाहू महाराजांनी बहुजनांच्या शिक्षणासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्णाला वेगळे महत्त्व आहे. अशा जिल्ह्णात स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाल्यानंतरही विद्यामंदिरला ‘हरिजनवाडा’ असे नाव आहे.
शाळेच्या नावातूनच जात स्पष्ट होते. स्पष्ट होऊ नये म्हणून नाव बदलण्याची तसदी अजून तरी शिक्षण विभागाने घेतलेली नाही. दलित, मागासवर्गीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत असलेल्या एकाही संघटनेने शाळेच्या नावाबद्दल असा आक्षेप घेतलेला नाही. गेल्या शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्य विकास कांबळे यांनी ‘हरिजनवाडा’ असे शाळेला नाव असल्यावर आक्षेप नोंदविला. त्यांनी ‘विद्यामंदिर शित्तूर वारुण’ असे नामकरण करावे, अशी मागणी केली आहे.

शाहूंच्या जिल्ह्णात शाळेला ‘हरिजनवाडा’ असे नाव आहे. स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षे होऊन गेले तरी शाळेचे नाव बदलावे, असे शिक्षण विभागाला वाटलेले नाही ही खेदाची बाब आहे. अन्य प्राथमिक शाळा गावाच्या नावाने आहेत तेथे मात्र ‘हरिजनवाडा’ असे नाव आहे. शिक्षण प्रशासन त्या शाळेत जाणीवपूर्वक मागासवर्गीय शिक्षक देते, अशीही माहिती मिळाली आहे. संवर्णाच्या विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरविली आहे. हे अतिशय गंभीर आहे. - विकास कांबळे,
जिल्हा परिषद सदस्य

‘विद्यामंदिर हरिजनवाडा’ असे शाळेचे नाव आहे. अनेक वर्षांपासून याच नावाने शाळा भरते. नाव बदलण्याची मागणी झाली. माझ्याकडे प्रभारी कार्यभार आहे. शाळेबद्दल अधिक माहिती नाही.
- टी. एल. मोळे,
प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी

शाहूंच्या जिल्ह्णात शाळेला ‘हरिजनवाडा’ असे नाव आहे. स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षे होऊन गेले तरी शाळेचे नाव बदलावे, असे शिक्षण विभागाला वाटलेले नाही ही खेदाची बाब आहे. अन्य प्राथमिक शाळा गावाच्या नावाने आहेत तेथे मात्र ‘हरिजनवाडा’ असे नाव आहे. शिक्षण प्रशासन त्या शाळेत जाणीवपूर्वक मागासवर्गीय शिक्षक देते, अशीही माहिती मिळाली आहे. संवर्णाच्या विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरविली आहे. हे अतिशय गंभीर आहे. - विकास कांबळे,
जिल्हा परिषद सदस्य

Web Title: 'Vidyamandir Harijanwada' in Shahu district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.