‘बर्ड्स ऑन शिवाजी युनिव्हर्सिटी कॅम्पस’मधून जैवविविधतेचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:21 AM2021-03-19T04:21:33+5:302021-03-19T04:21:33+5:30
या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यापीठाचा परिसर हा निसर्गरम्य आणि ...
या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यापीठाचा परिसर हा निसर्गरम्य आणि देखणा तर आहेच, पण त्याचबरोबर विविध पशुपक्ष्यांसाठी सुरक्षित अधिवास असल्याचे डॉ. गायकवाड यांच्या संशोधनातून सिद्ध झाले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही.डी. नांदवडेकर, डॉ. आर.के. कामत, व्ही.एस. मन्ने, एम.व्ही. वाळवेकर उपस्थित होते. दरम्यान, विद्यापीठाच्या ८५३ एकर परिसरामध्ये सातत्याने पक्षीनिरीक्षण करून डॉ. गायकवाड यांनी सर्वसाधारण आणि दुर्मीळ अशा सुमारे ११५ पक्षी असल्याचे नोंदविले आहे. त्यांची छायाचित्रेही टिपली. या छायाचित्रांचे कॉफी टेबल बुक त्यांनी साकारले आहे. डॉ. गायकवाड यांना विद्यापीठाच्या ज्या परिसरात जे पक्षी आढळले, त्या ठिकाणी संबंधित पक्ष्याचा सचित्र माहितीफलकही उभारला आहे.
चौकट
क्यूआर कोडची संकल्पना
या कॉफी टेबल बुकमध्ये पक्ष्याचे छायाचित्र, त्याची थोडक्यात माहिती दिली. माहिती असेल्या प्रत्येक पानावर एक क्यूआर कोड छापला आहे. ज्यांना अधिक माहिती घ्यावयाची असेल, त्यांनी क्यूआर कोड स्कॅन केला की, लगेच त्या पक्ष्याची सविस्तर माहिती त्यांच्या मोबाइलवर दिसेल.
फोटो (१८०३२०२१-कोल-विद्यापीठ कॉफी टेबल बुक) : शिवाजी विद्यापीठात गुरुवारी डॉ. एस. एम. गायकवाड यांच्या ‘बर्ड्स ऑन शिवाजी युनिव्हर्सिटी कॅम्पस’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते झाले. यावेळी शेजारी पी. एस. पाटील, विलास नांदवडेकर, आर. के. कामत आदी उपस्थित होते.