दक्षता हीच खरी उपाययोजना : प्रांताधिकारी रामहरी भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:26 AM2021-04-09T04:26:56+5:302021-04-09T04:26:56+5:30
बाचणी (ता. कागल) येथे कागल तालुक्यातील कोरोनारुग्णांची स्थिती, उपाययोजना व लसीकरणाबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आरोग्य, महसूल ...
बाचणी (ता. कागल) येथे कागल तालुक्यातील कोरोनारुग्णांची स्थिती, उपाययोजना व लसीकरणाबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आरोग्य, महसूल व ग्रामपंचायत अशा तिन्ही विभागांचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रांताधिकारी भोसले यांनी, कोरोनाची लस मिळेल तशी तत्काळ घेऊन कोरोना साथीच्या ब्रेक द चेनसाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे, तालुका आरोग्याधिकारी शिंदे यांनीही मार्गदर्शन केले.
बैठकीत ग्रामविकास अधिकारी सागर पार्टे, आरोग्यसेवक सुरज कांबळे, उपसरपंच जी. डी. पाटील, उत्तम पाटील, अल्लाबक्ष शहानेदिवाण, रमेश कांबळे, पंडित कुंभार, उत्तम चौगले यांनी सूचनावजा मते मांडली.
कार्यक्रमास तलाठी, कोतवाल, ग्रामपंचायतींचे सर्व पदाधिकारी, आशा व अंगणवाडी स्वयंसेविका, पंचक्रोशीतील आरोग्य, महसूल व ग्रामपंचायत विभागांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळी :
बाचणी (ता. कागल) येथे कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी रामहरी भोसले. शेजारी तहसीलदार शिल्पा ठोकडे, आरोग्य, महसूल व ग्रामपंचायत विभागाचे पदाधिकारी.