इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस कोल्हापूरच्या अध्यक्षपदी विजय कोराणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:27 AM2021-02-24T04:27:08+5:302021-02-24T04:27:08+5:30

नागाळा पार्क येथील एका लॉनमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस् कोल्हापूर सेंटरची वार्षिक सभा झाली. त्यामध्ये सन २०२० ते ...

Vijay Korane as President of Indian Institute of Architects Kolhapur | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस कोल्हापूरच्या अध्यक्षपदी विजय कोराणे

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस कोल्हापूरच्या अध्यक्षपदी विजय कोराणे

Next

नागाळा पार्क येथील एका लॉनमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस् कोल्हापूर सेंटरची वार्षिक सभा झाली. त्यामध्ये सन २०२० ते २०२२ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्ष, सचिव यांच्यासह संगीता भांबुरे (उपाध्यक्ष), संतोष रामाणे (खजिनदार), इंद्रजित जाधव, उज्ज्वला मिरजकर, सुनील विचारे, प्रमोद चौगुले (कार्यकारिणी सदस्य) यांचा समावेश आहे. सुनील पाटील, संजय आडके, उमेश माने, सचिन घटगे, संजय आवटे, राहुल श्रेष्ठी, गिरीजा कुलकर्णी, आदी उपस्थित होते. सचिव प्रिया देशपांडे यांनी अहवाल सादर केला. त्याला बहुमताने मंजुरी मि‌ळ‌ाली. संस्थेचे अध्यक्ष सतीशराज जगदाळे यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी, सदस्यांचा सत्कार केला.

चौकट

कामांबाबतची माहिती

नूतन अध्यक्ष विजय कोराणे यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये नियोजित केलेल्या कामांची माहिती दिली. कोल्हापूरमधील ऐतिहासिक वास्तूंचे जतन, अर्बन डिझाइन, कोल्हापूर विकास आराखड्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले टाऊन प्लॅनिंग, आदींबाबत कामे गांभीर्याने करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

फोटो (२३०२२०२१-कोल-विजय कोराणे (आर्किटेक्टस), वंदना पुसाळकर (आर्किटेक्टस), सतीशराज जगदाळे (आर्किटेक्टस), अभिनंदन मगदूम (आर्किटेक्टस).

Web Title: Vijay Korane as President of Indian Institute of Architects Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.