चित्रपटसृष्टीला गतवैभव आणणार-- विजय पाटकर

By Admin | Published: April 19, 2016 11:40 PM2016-04-19T23:40:04+5:302016-04-20T00:45:29+5:30

चित्रपटांची वितरण व्यवस्था सुरू करण्याचा मानस -मराठी चित्रपट महामंडळ निवडणूक

Vijay Patkar, who is making the film industry proud - Vijay Patkar | चित्रपटसृष्टीला गतवैभव आणणार-- विजय पाटकर

चित्रपटसृष्टीला गतवैभव आणणार-- विजय पाटकर

googlenewsNext

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसा प्रचार शिगेला पोहोचू लागला आहे. यात एकूण नऊ पॅनेलसह १२० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. त्यापैकी विद्यमान अध्यक्ष विजय पाटकर यांनी आपल्या ‘क्रियाशील पॅनेल’ची भूमिका ‘लोकमत’शी बोलताना जाहीर केली.
प्रश्न : टॉलिवूडच्या धर्तीवर सर्वत्र मराठी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस कधी येणार ?
उत्तर : मी आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा कामाला अधिक महत्त्व देतो. त्यामुळे मी मराठी चित्रपट सातासमुद्रापार कसा जाईल याकडे लक्ष दिले आहे. त्यासाठी निलकांती पाटेकर यांच्या सहयोगाने डेस्क सुरूकेला आहे. एकदा जागतिक पातळीवर आपले चित्रपट जाऊ लागले की, आपोआप इंटरनॅशनल ब्रँड तयार होईल. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीला निश्चित येत्या काळात चांगले दिवस येतील. नाशिक येथेही चित्रनगरी उभी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चित्रपटांची वितरण व्यवस्था सुरू करण्याचा मानस आपल्या पुढील कारकिर्दीत आहे.
प्रश्न : महामंडळाचे अध्यक्ष म्हणून सभासदांच्या हिताकरिता काय भूमिका घेतली?
उत्तर : महामंडळाच्या कारकिर्दीत संकेतस्थळ निर्माण केले. सभासदांकरिता आरोग्य शिबिर घेतले. महामंडळाचे सभासद होतानाच्या जाचक अटी रद्द केल्या. त्यामुळे संख्याही वाढली. महामंडळाचे ओळखपत्र हिंदी चित्रपटसृष्टीत चालावे म्हणून प्रयत्न केले. त्यामुळे रोजगारही मिळू शकेल. वरिष्ठ सभासदांना पेन्शनही माझ्याच कारकिर्दीत सुरू केली. सभासदांकरिता हेल्थ इन्शुरन्स, २४ तास हेल्पलाईन नंबरची सुविधाही केली. मी यापुढे निवडून येवो अगर न येवो; मात्र सातत्याने मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी कार्यरत राहणार आहे.
प्रश्न : चित्रनगरीसाठी काय प्रयत्न केले?
उत्तर : कोल्हापूर ही मराठी चित्रपटसृष्टीची पंढरी आहे. त्यामुळे या पंढरीत अनेक दिग्गज कलाकार निर्माण झाले. त्यामुळे यापुढेही ही परंपरा कायम राहावी, याकरिता सरकार दरबारी कोल्हापूरचे वैभव असणाऱ्या चित्रनगरीला पुन्हा मूळ रुळावर आणण्यासाठी प्रयत्न केले. माझ्या कारकिर्दीत चित्रनगरीतील काही कामांचा पाठपुरावाही केला आहे.
प्रश्न : मराठी चित्रपट निर्मात्यांना अनुदान सुलभ होण्याकरिता काय प्रयत्न करणार?
उत्तर : मला सभासदांनी पुन्हा संधी दिल्यास चित्रपटसृष्टीतील शेवटच्या घटकाच्या समस्याही जाणून घेऊन त्यांचे निराकरण करेन. याशिवाय राज्य शासनाच्या अनुदान समितीमध्ये जास्तीत जास्त सदस्य हे महामंडळाचेच असावेत, याकरिता विशेष प्रयत्न करीन.
प्रश्न : आपल्या क्रियाशील पॅनेलमध्ये कोणाला संधी दिली आहे?
उत्तर : आपल्या पॅनेलमध्ये समृद्धी पोरे, प्रकाश जाधव, विजय राणे, संतोष भांगरे, राजेश देशपांडे, सतीश बिडकर, बाबासाहेब लाड, संजीव नाईक, अमोद दोषी, अनिल निकम, निवेदिता सराफ, रत्नकांत जगताप, बाळकृष्ण बारामती (कामगार) यांना संधी दिली आहे. (प्रतिनिधी)
 

Web Title: Vijay Patkar, who is making the film industry proud - Vijay Patkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.